सोनी मराठीवरून सुबोध भावे घडवणार लोककलांनी समृध्द महाराष्ट्राचं दर्शन
सोनी मराठी एका पाठोपाठ एक कमाल कार्यक्रमांचा नजराणा प्रेक्षकांसमोर पेश करत आहे. २ डिसेंबरपासून सुरू होणारा लोककलांवर आधारित “जय जय महाराष्ट्र माझा” यापैकीच एक. महाराष्ट्रावर प्रेम असणाऱ्या प्रत्येकाचा आणि महाराष्ट्र जाणून घेण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकासाठीचा हा कार्यक्रम. सोनी मराठीवर सुरू होणाऱ्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्राने आजवर जपलेल्या परंपरांचं, संस्कृतीचं आणि लोककलांचं सिंहावलोकन होणार आहे. . पारंपरिक लोककलांनी नटलेला हा कार्यक्रम म्हणजे महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये जपल्या जाणार्या लोककला नव्याने जिवंत करण्याचा सोनी मराठीचा एक प्रयत्न आहे. विशेष म्हणजे लोककलांचं ज्ञान असणारा अभिनेता सुबोध भावे या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे.
ज्या लोककलांनी महाराष्ट्र घडला, एक झाला अशा शाहीरी, लावणी, पोवाडा, तमाशा, भजन, कीर्तन, भारूड, गोंधळ, वासुदेवसारख्या विविध लोककलांचा आविष्कार या मंचावर पाहता येणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या शकुताई नगरकर, शाहीर अमर शेखांची परंपरा चालवणारे निशांत शेखसारखे कलाकार या कार्यक्रमातून प्रेक्षकांना भेटणार आहेत.
२ डिसेंबरपासून सोमवार आणि मंगळवार रात्री ९ वाजता सादर होणाऱ्या या कार्यक्रमाची सुरूवात महाराष्ट्र गीताने होणार असून पुढे आदर्श शिंदे, नंदेश उमप, कार्तिकी गायकवाड, प्रसनजीत कोसंबीसारखी मंडळी आपल्या लोककलांचा वारसा प्रेक्षकांसमोर सादर करणार आहेत. तेव्हा महाराष्ट्रातील लोककलांच्या उत्सवात तुम्हीही सहभागी व्हा २ डिसेंबरपासून सोम. आणि मंगळ. रात्री ९ वाजता, फक्त सोनी मराठीवर.