Marathi News

तरुणाईला ठेका धरायला लावणारे ‘विक्की वेलिंगकर’ सिनेमाचे ‘डा रा डिंग डिंग ना’ हे दुसरे गाणे प्रदर्शित

Vicky Velingkar - Da Ra Ding Ding Na
Vicky Velingkar – Da Ra Ding Ding Na

अर्जुन सिंग बरन आणि कार्तिक डी निशाणदार निर्मित व प्रणय चोकसी आणि डान्सिंग शिवा’ प्रस्तुत तसेच सौरभ वर्मा दिग्दर्शित मराठी चित्रपट विक्की वेलिंगकर’ या सिनेमाचा काही दिवसांपूर्वी ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला असून त्याला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. या ट्रेलरने समाजमाध्यमांवर चांगलीच हलचल निर्माण केली असून प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दलची उत्कंठा अधिक ताणली गेली आहे. विक्की वेलिंगकर’ चित्रपटातील गायक अवधूत गुप्ते आणि ओमकार पाटील यांच्या आवाजातील टीकिटी टॉक‘ हे गाणेदेखील प्रदर्शित करण्यात आले होते यालाही प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. आता विक्की वेलिंगकर सिनेमाचे डा रा डिंग डिंग ना’ हे दुसरे गाणे चित्रपटाच्या निर्मात्यांकडून नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे. विक्की वेलिंगकर या चित्रपटात सोनाली कुलकर्णीस्पृहा जोशीविनिता खरातकेतन सिंगजुई पवारगौरव मोरेसंग्राम समेळ आणि रमा जोशी या कलाकारांच्या महत्वाच्या भूमिका असून हा चित्रपट ६ डिसेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.

विक्की वेलिंगकर’ चित्रपटाच्या या नवीन गाण्याचे “साज अशी कि मन जुळता थांबे नावाऱ्यावरीपाय खाली पण पडे ना ,डोन्ट स्टॉप टू ट्याप युअर फीट ऑन द फ्लोर,  मन बोले नाचू मोर मोर मोरउद्यावरी आहे तुझा माझा कसला जोरडा रा  डिंग  डिंग  ना” हे बोल असून डा रा डिंग डिंग ना’ हे गाणे पीयूष अंभोरे याने गायले आणि लिहिले असून  मनन मुंजाळ याने संगीतबद्ध केले आहे.

या गाण्यामध्ये सोनाली कुलकर्णी म्हणजेच विक्की कोणाचा तरी शोध घेताना दिसत असून या गाण्यात मास्क मॅन देखील दिसत आहे ,त्याशिवाय या गाण्याचा संपूर्ण मूड पूर्णपणे क्लब प्रकारचा असून हे गाणे तरुणाईला ठेका धरायला लावेल आणि तरुण मुलामुलींना हे गाणे नक्की आवडेल आणि हे ‘ डा रा  डिंग  डिंग  ना ‘ गाणे ऐकल्यानंतर  प्रेक्षकांमध्ये विक्की वेलिंगकर’ या सिनेमाची उत्कंठा अधिकच वाढेल यात काही शंका नाही.  

 मनन मुंजाळ आणि पीयूष अंभोरे म्हणालेहे गाणे तयार करताना खूप मज्जा आली या गाण्याचा आमच्यासाठी अविस्मरणीय असा अनुभव होता या गाण्याचा मूड क्लब प्रकारचा  असून हे गाणे तरुणाई ला नक्की आवडेल असे आम्हाला वाटते या सिनेमासाठी काम करण्याची  संधी सौरभ वर्मा आणि जिसिम्सने आम्हाला दिली याबद्दल आम्ही त्यांचे  आभार मानतो “

सौरभ वर्मा यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेल्या या चित्रपटाची निर्मिती जीसिम्सचे अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार तसेच प्रणय चोकसीडान्सिंग शिवा प्रॉडक्शनचे अनुया चौहान कुडेचारितेश कुडेचा आणि लोकीज स्टुडीओचे सचिन लोखंडे आणि अतुल तारकर यांची आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button