“तु जवळी ये ना” मराठी अल्बम सॉंग मराठी म्युझिक चॅनलवर प्रदर्शित
तु जवळ ये ना सॉंग नुकतंच मराठी म्युझिक चॅनल वरती प्रदर्शित झाले, या सॉंग मधून नवीन जोडी लागीर झालं जी फेम (जम्या) म्हणजेच अमरनाथ खराडे आणि नवीन चेहरा माधुरी काळे आपल्या भेटीला येत आहेत, या अल्बमची निर्मिती ध्रुवी फिल्मस पुणे यांनी केली आहे, यापूर्वी ध्रुवी फिल्मस पुणे यांनी “प्रेम बावरे”, “पाऊस पहिला” या अल्बम बरोबरच बऱ्याच शॉर्ट फिल्मची निर्मिती केली आहे आणि त्याचे दिग्दर्शन रोहन सदाशिव शिंगाडे यांनी केले आहे.
या अल्बम सॉंगसाठी गीत आणि संगीत अनिकेत सावंत यांनी केले आहे, हे सॉंग अनुराग गोडबोले आणि शाल्मली सुखटणकर यांनी गायले आहे, या सॉंगचे संगीत संयोजन प्रणव हरिदास यांनी केले आहे तसेच यासाठी व्हायोलिन – श्रुती भावे, गिटार आणि बास – अमोग दांडेकर, मिक्सिंग आणि मास्टरिंग – विवेक कांबळी यांनी केले आहे.
तसेच या अल्बम सॉंगसाठी सिनेमॅटोग्राफर – प्राण शिरुरकर, ड्रोन सुशील वाघचौरे कोरिओग्राफर – अवधूत चव्हाण, कॉस्च्युम – विदिषा अमदाबडे, हेअर आणि मेकअप – प्रियांका रामपुरे असिस्टंट डिरेक्टर – ऋषिकेश गोसावी, स्टील फोटोग्राफर – हेमंत भालेराव, प्रॉडक्शन मॅनेजर – अंकुश राठोड यांनी केले आहे,
अशी ही टीम असणारे “तु जवळी ये ना हे अल्बम सॉंग प्रेक्षकांच्या आवडीस उतरेल असे या सॉंगचे दिग्दर्शक आणि संकलक आणि ध्रुवी फिल्मस पुणेचे निर्माते,दिग्दर्शक, लेखक आणि संकलक रोहन सदाशिव शिंगाडे यांनी सांगितले, तसेच लवकरच अशा नवनवीन मराठी अल्बम सॉंगची निर्मिती करणार आहे असे रोहन शिंगाडे यांनी सांगितले.