Marathi News

मिस्टर अँड मिसेस सदाचारी लवकरंच प्रेक्षकांच्या भेटीला

मिस्टर अँड मिसेस सदाचारी

इंडियन फिल्म स्टुडियोज निर्मित ‘मिस्टर अँड मिसेस सदाचारी’ सिनेमाची चर्चा सध्या जोरदार सुरु आहे. आशिष वाघ  आणि उत्पल आचार्य या जोडगोळीच्या निर्मितीचा ‘मिस्टर अँड मिसेस सदाचारी’ हा आणखी एक सिनेमा येत्या शिवजयंतीला १९ फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. आशिष वाघ दिग्दर्शक आणि निर्माता अशी दुहेरी  भूमिका बजावत आहेत. दिग्दर्शक म्हणून आशिष यांचा हा पहिलाच सिनेमा आहे.  अभिनेता वैभव तत्ववादी आणि प्रार्थना बेहरे यांची जोडी पुन्हा एकदा नव्याने या सिनेमाच्या निमित्ताने पहायला मिळणार आहे. तसेच अभिनेता मोहन जोशी, प्रदीप वेलणकर, विजय आंदळकर, उमा सरदेशमुख, उदय नेने, सुमुखी पेंडसे, प्रसाद जवादे, अनुजा साठे, कांचन पगारे यांच्याही भूमिका वाखाणण्या सारख्या आहेत.  मॉरिशियसारख्या नयनरम्य ठिकाणी तसेच मुंबई, कोल्हापूर येथे चित्रीकरण झालेल्या या सिनेमाची गाणी तितकीच धमाकेदार आहेत.  सिनेमाचं टायटल साँग रोहित राऊत याने गायलं असून ओमकार मंगेश दत्त याने लिहिलं आहे. या गाण्याचे मूळ संगीत व्ही. हरी कृष्ण यांनी दिले असले तरी त्याला पंकज पडघन यांनी आपला मराठमोळा तडका दिला आहे.काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या प्रेम ऋतू या गाण्याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. गायक सागर फडके, सायली पंकज, गीतकार ओमकार मंगेश दत्त आणि संगीत दिग्दर्शक व्ही. हरी कृष्ण या टीमने हे गाणं केलं आहे.

सिनेमाची जान असलेलं छत्रपती शिवाजी महाराज यांची स्तुती असलेलं जगदंब हे गाणं याप्रसंगी पहिल्यांदाच दाखवण्यात  आलं.  अत्यंत वेगळ्या पद्धतीने चित्रीकरण करण्यात आलेल्या या  गाण्यात २०० नृत्य कलाकारांसोबत  वैभव प्रेक्षकांना डॅशिंग लूक मध्ये दिसणार आहे.  आदर्श शिंदे आणि सायली पंकज यांच्या तुफान आवाजातील गाण्याला पंकज पडघन यांनी संगीतबद्ध केलं आहे. प्रणीत कुलकर्णी यांनी प्रथमच विशेषणांवर आधारित असे हे युनिक गाणे लिहिले आहे. नात्यावर आधारित ‘नाते नव्याने’ हे गाणं पण प्रथमच दाखवण्यात आलं.  हर्षवर्धन यांनी या गाण्याला आवाज दिला असून ओमकार मंगेश दत्त याने लिहिलं आहे.  या गाण्याचे संगीतकार व्ही. हरी कृष्ण  आहेत. ‘सांग ना रे’ हे प्रेमगीत देखील यावेळी दाखवण्यात आलं.

नुकतंच प्रेमात पडलेल्या युगुलाच्या भावना अत्यंत सुंदर चित्रित केल्या आहेत. हे गाणं  सागर फडके यांनी गायलं असून गुरु ठाकूर यांनी शब्दबद्ध आणि पंकज पडघन यांनी संगीतबद्ध केलं आहे. रोमॅंटिक,कॉमेडी आणि अॅक्शनचा उत्तम मेळ असलेला हा सिनेमा आहे. स्वतःचं प्रेम जिंकण्यासाठी केलेला संघर्ष, वडील आणि मुलाचे  नाते, आयुष्यातील मित्रांचे स्थान यावर आधारित सिनेमाची कथा आहे. या सिनेमाचं कला दिग्दर्शन महेश साळगावकर, छायादिग्दर्शन बालाजी रंघा, नृत्य दिग्दर्शन एफ.ए.खान आणि सुभाष नकाशे, संकलन मयूर हरदास, रंगभूषा महेश बराटे या उत्तम काम करणाऱ्या कलाकरांची फळी सिनेमासाठी काम करत आहे. सिनेमाची पटकथा आणि संवाद  प्रवीण विठ्ठल तरडे यांची आहे. हा सिनेमा एंटरटेनमेंटची उत्तम मेजवानी असेल

Related Articles

Leave a Reply

Back to top button