Marathi News

‘भारत’मध्ये नोरा फतेहीचे आयटम नंबर नाही तर आहे सिच्युएशनल साँग, दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

नोरा फतेही - Nora Fatehi
नोरा फतेही – Nora Fatehi

नोरा फतेहीने आपल्या डान्सच्या माध्यमातून रसिकांच्या मनात आपली छाप उमटविली आहे. ‘दिलबर दिलबर’, ‘कमरियां’, ‘रॉक द पार्टी’, ‘बेबी मरवा के मानेंगी’ यांसारख्या गाण्यांचे बोल ऐकताच चेहऱ्यासमोर येते ती नोरा फतेही. मात्र यावेळी नोरा भारत चित्रपटातून वेगळ्या अंदाजात पहायला मिळणार आहे. तिचे या चित्रपटात तुर पेया हे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. पण, हे आयटम नंबर नसून सिच्युएशनल साँग आहे. या गाण्याला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

‘तुर पेया’ या गाण्यात सलमान खानसोबत नोरा फतेही पहायला मिळते आहे. या गाण्यातील सलमानसोबतच नोराच्या डान्सची देखील सगळीकडे खूप चर्चा होत आहे. ‘भारत’मधील भूमिका व गाण्यांबद्दल नोराने सांगितले की, ‘तुर पेया’ हे आयटम साँग नसून सिच्युएशनल गाणे आहे. तसेच या चित्रपटात माझी छोटीशी भूमिका आहे. पण, प्रेक्षकांना या चित्रपटातील माझा अभिनय लक्षात राहिल. सलमान खानच्या चित्रपटाचा भाग असणे ही सिनेइंडस्ट्रीमध्ये खूप मोठी बाब आहे.

नोरा फतेही - Nora Fatehi
नोरा फतेही – Nora Fatehiनोरा फतेही – Nora Fatehi

नोरा फतेहीला आयटम नंबरसाठी ओळखले जाते, तिला ही प्रेक्षकांमधील इमेज बदलायची असून याबद्दल ती म्हणते की, एक प्रोजेक्ट इमेज बदलू शकत नाही. माझ्याकडे यावर्षी काही प्रोजेक्ट आहेत ज्यात मी रसिकांना डान्स व म्युझिकपेक्षा वेगळे काहीतरी करताना दिसणार आहे.’भारत’ चित्रपटात सलमानचे वेगवेगळे लूक्स प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटात सलमानसोबत कतरिना कैफदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच नोराही  महत्वाच्या भूमिकेत दिसेल. हा चित्रपट ५ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
नोरा फतेहीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर ती ‘भारत’ व्यतिरिक्त ‘बाटला हाऊस’, ‘स्ट्रीट डान्सर थ्रीडी’ या चित्रपटात पहायला मिळणार आहे.

Nora Fatehi
Nora Fatehi

Related Articles

Leave a Reply

Back to top button