Marathi News

बिग बी यांच्या ‘AB आणि CD’ या मराठी सिनेमाचा मुहुर्त संपन्न

AB ani CD Movie
AB ani CD Movie

आपल्या मराठी सिनेमांच्या विषयात नेहमीच नाविन्य असतं. नवीन मराठी सिनेमा आला की प्रेक्षकांना खात्री असते की काहीतरी नवीन अनुभवयाला मिळणार. सिनेमाच्या विषयासह जर सिनेमातील पात्र देखील प्रेक्षकांच्या आवडीची असतील तर बात काही औरच असते. अशाच एका नवीन सिनेमाचा मुहुर्त नुकताच पार पडला आणि या सिनेमाचे नाव आहे ‘AB आणि CD’. या सिनेमाच्या मुहुर्ताच्या निमित्ताने मराठी प्रेक्षकांना एक खास खुशखबर मिळणार आहे आणि ती खूषखबर बिग बी यांच्या रुपातून येणार आहे. म्हणजेच, तब्बल २५ वर्षांनी बिग बी अमिताभ बच्चन ‘AB आणि CD’ या सिनेमाच्या निमित्ताने मराठीमध्ये एण्ट्री घेणार आहेत.

नुकताच, या सिनेमाचा मुहुर्त सोहळा माननीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यांच्यासह विक्रम गोखले, सागर तळाशिलकर, सीमा देशमुख, लोकेश गुप्ते, जयंत सावरकर, सुनिल गोडबोले, अरुण पटवर्धन, प्रशांत गोखले, सुभाष खुंडे, मुक्ता पटवर्धन, अक्षय टंकसाळे, सायली संजीव आणि साक्षी सतिश हे देखील यावेळी उपस्थित होते.

डिजीटल मिडीयावर नेहमीच नवनवीन उपक्रम घेऊन येणा-या प्लॅनेट मराठी आणि अक्षय बर्दापूरकर यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे  मिलिंद लेले दिग्दर्शित ‘AB आणि CD’ या सिनेमात अमिताभ बच्चन, विक्रम गोखले, सुबोध भावे, सायली संजीव आणि अक्षय टंकसाळे यांच्या भूमिका आहेत. अमिताभ बच्चन यामध्ये कॅमिओ रोल साकारणार असून विक्रम गोखले यांच्या मित्राच्या भूमिकेत दिसतील. सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे आणि लवकरच ‘AB आणि CD’ प्रेक्षकांच्या भेटीस येईल.

Related Articles

Leave a Reply

Back to top button