Marathi News

मराठमोळ्या श्रेयशचे हिंदी मनोरंजनसृष्टी मध्ये पदार्पण

Shreyash Jadhav Chhod De Song Released:

Shreyash Jadhav Chhod De Song Released:
Shreyash Jadhav Chhod De Song Released:

महाराष्ट्रातील तारुण्य नवनवीन कलाक्षेत्रात यशाच्या उंच भराऱ्या घेत आहे. रॅपर, निर्माता, दिग्दर्शक, संगीत अशा मनोरंजनाच्या विविध माध्यमातून मराठी नवं तरुण श्रेयश जाधव आपल्याला आज वर पाहायला मिळाला. श्रेयश नेहमीच आपल्या नव-नवीन हिप हॉप सॉन्गने प्रेक्षकांची मने जिंकत आलाय. मराठी इंडस्ट्रीला श्रेयशने रॅपचा पायंडा घालून दिला. अतिशय वेगवेगळ्या विषयांवर श्रेयसने केलेले मराठी हिप हॉप, रॅप तसेच गाणी आज पर्यंत खूप गाजली आहेत. त्याचप्रमाणे ऑनलाईन-बिनलाईन, बस-स्टॉप, बघतोस काय मुजरा कर या चित्रपटांचाही तो निर्माता होता. त्यानंतर “मी पण सचिन” या मराठी चित्रपटातून श्रेयश दिग्दर्शक आणि लेखक या नव्या रूपात प्रेक्षकांच्या समोर आला. सामाजिक विषय असो किंवा मग इतर काही असो त्याने नेहमीच निरनिराळे विषय अतिशय सुबक रित्या प्रेक्षकांसमोर मांडले आहेत. श्रेयशचा आज पर्यंतचा प्रवास अगदी वाखाडण्याजोगा आहे. मराठी इंडस्ट्री मधून सुरुवात केलेल्या श्रेयश ने आता “छोड दे” उर्फ किंग जे. डी. या हिंदी रोमँटिक हिप हॉप अल्बम सॉन्गने हिंदी इंडस्ट्री मध्ये पदार्पण केले आहे.
“छोड दे” हे हिंदी हिप हॉप सॉन्ग दि किंग जे. डी आणि गणराज प्रोडकशन्स निर्मित असून बाली हे या हिप हॉप चे गीतकार आहेत तसेच श्रेयश जाधव उर्फ किंग जे. डी. हे गायक आहेत. दिग्दर्शन आणि नृत्यदिग्दर्शन सुजीत कुमार याने केले असून एखादी प्रेम कहाणी प्रस्तावा नंतर अगदी तिच्यासोबतच्या अनोख्या पद्धतीने केलेल्या लग्नापर्यंत कशी पूर्णत्वास जाते या आशयाला अनुसरून हे सॉन्ग आहे.
“छोड दे” या हिंदी रोमँटिक हिप हॉप अल्बम सॉन्गचं विशेष म्हणजे या आधी बऱ्याचशा चित्रपटांचे शूट परदेशी झाले आहे. परंतु पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या मुलाने हिंदी मनोरंजनसृष्टी मध्ये पदार्पण करताना हिंदी अल्बमसाठी पहिलंवहील्या रॅप सॉन्गचं चित्रीकरण युरोपमधील अर्मेनिया देशात केल आहे. हिपहॉप सॉन्गच्या चित्रीकरणासाठी लागणाऱ्या लहानसहान गोष्टींचा अगदी पूरक स्वरूपात “छोड दे”च्या चित्रीकरणात समावेश केला आहे.
मराठमोळा श्रेयश जाधव या अप्रतिम हिप हॉप सॉन्ग विषयी सांगताना म्हणाला “माझी नाळ मराठीशी जोडलेली आहे. या आधी मी उत्तमोत्तम मराठी गाणी, रॅप्स, चित्रपट केले आहेत. ज्यांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. मला मराठी भाषे पूर्ती मर्यादित न राहता हिंदी मध्ये काही तरी उत्तमच घेऊन पदार्पण करायचं होत. “छोड दे” च्या शूटच्या ठिकाणापासून पासून ते अगदी शेवट लग्नाच्या विशिष्ट मांडणी पर्यंत मी छोड दे ला नाविन्यपूर्ण रूपात प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. मला सांगायला अत्यांनंद होतो कि प्रेक्षकांनी माझ्या या नव्या “छोड दे” ला हि भरगोस प्रतिसाद दिला आहे. असच प्रेम मला या ही पुढे माझ्या प्रेक्षकांकडून मिळत राहील अशी आशा आहे.”

Related Articles

Leave a Reply

Back to top button