“समांतर” पहिलीवहिली बहुभाषिक मराठी वेबसिरीज

Samatar Marathi Web Series:

Samatar Marathi Web Series
Samatar Marathi Web Series

एकाचा भूतकाळ दुसऱ्याच भविष्य असेल तर काय घडू शकत? या आशयाला अनुसरून एक थरारक कथा एम एक्स प्लेअरने समांतर या वेबसिरीज च्या रूपात प्रकाशित केली आहे. मराठी साहित्य हे किती समृद्ध आणि प्रयोगशील आहे, किती महत्वपूर्ण आहे तसेच ते महाराष्ट्र किंवा एका विशिष्ट वर्गापुरतं मर्यादित राहू नये म्हणूनच समांतर ही मराठमोळी कथा अमराठी तसेच बहुसंख्य जगभरच्या प्रेक्षकांपर्यंत पोहचावी, तिला भाषेचे बंधन नसावं म्हणून मराठी व्यतिरिक्त इतर ३ भाषा म्हणजेच हिंदी, तेलगू आणि तमिळ भाषांमध्ये ही वेबसिरीज प्रदर्शित करण्यात आली. एवढंच नाही तर जगभरात समांतर ला पोहोचवता याव म्हणून इंग्रजी सबटायटल सुद्धा देण्याचा निर्णय एम एक्स प्लेयरने घेतला. यामुळे मराठी साहित्य आणि कलाकार यांच्यावर सकारत्मक परिणाम होईलच त्याच बरोबर मराठी इंडस्ट्री ही मर्यादित प्रेक्षकांपूर्ती सीमित न राहता जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल.

समांतर ही मराठी वेब सीरिज १३ मार्चला एम एक्स प्लेयर या विनामूल्य माध्यमावर प्रदर्शित करण्यात आली आहे. सुहास शिरवळकर यांच्या लिखित स्वरूपातील साहित्याचे सोनेरी पडद्यावर रूपांतरण होण्याची ही तिसरी वेळ आहे. हरहुन्नरी आणि दर्जेदार कलाकृती देणारा अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेला दिग्दर्शक म्हणून ज्याची ओळख आहे अश्या सतीश राजवाडे याने या वेबसिरीजचे दिग्दर्शन केले आहे. स्वप्नील जोशी आणि तेजस्विनी पंडित जवळ-जवळ ५ वर्षांनंतर पुन्हा एकदा या वेबसिरिजच्या निमित्ताने वेब सारख्या नव्या माध्यमावर एकत्र दिसत आहेत. सतीश राजवाडे, स्वप्नील जोशी आणि तेजस्विनी पंडित यांची समांतर ही पहिलीवहिली मराठी वेबसीरिज आहे.
या वेबसिरीजचा नायक म्हणजेच कुमार महाजन स्वतःच्या भविष्याविषयी पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तर शोधण्याचा प्रवासाला निघतो. त्याच्या भविष्याचा आणि सुदर्शन चक्रपाणी या व्यक्तीचा नक्की संबंध काय हे शोधण्याची त्याची धडपड आणि त्याची चित्तथरारक गोष्ट एम एक्स ओरिजिनलची निर्मिती असलेली ‘समांतर’ ही वेबसिरीज उलघडते. १३ मार्च रोजी ही वेबसिरीज एम एक्स प्लेयर वर प्रकाशित झाली असून सर्व भाग विनामूल्य पाहायला उपलब्ध आहेत.

About justmarathi

Check Also

Hirkani

महिला दिनानिमित्त हिरकणी चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमिअर सोनी मराठीवर !

  ८ मार्च, जागतिक महिला दिन! स्त्रीशक्तीचा जागर करण्याचा हा दिवस. या दिनाचे औचित्य साधून इतिहासातल्या एका रणरागिणीवर आधारित हिरकणी या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमिअर सोनी मराठी करणार आहे. आपल्या तान्ह्या बाळाच्या ओढीने व्याकुळलेल्या हिरकणीच्या शौर्याची ही गाथा. आपल्या बाळासाठी रायगडाचा अतिकठीण कडा उतरणारी हिरकणी ध्येयाने झपाटलेल्या स्त्रीशक्तीचं नेतृत्व करते. आज घर आणि करिअर सांभाळणारी प्रत्येक स्त्री या हिरकणीइतकीच सामर्थ्यवान आहे. आई, मुलगी, बहीण, पत्नी अशा कैक भूमिका साकारणारी  स्त्री ही स्वयंसिद्धा आहे, ‘ती’च्या असण्याने जग समृद्ध आहे. स्त्री ही आदिमाता आहे, जननी आहे. आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्या स्वतःच्या पायावर उभ्या आहेत आणि सर्व क्षेत्रात नाव कमवतायत. चूल आणि मूल या चौकटीतून स्वतःला बाहेर काढून घराबरोबरच स्वतःची ओळख जपणारी स्त्री ही आजच्या काळातील खरी हिरकणी आहे. घरी भुकेलेल्या आपल्या तान्ह्या बाळासाठी हिरकणी आपल्या जिवाची पर्वा न करता रायगडाचा रौद्र कडा उतरली होती. आपल्या बाळासाठी हिरकणीने दाखवलेल्या या सामर्थ्याची दखल खुद्द छत्रपती शिवाजीमहाराजांनी घेतली आणि तिच्या शौर्याला सलाम म्हणून त्या कड्याच्या जागी बांधलेल्या बुरुजाला ‘हिरकणी बुरूज’ हे नाव दिले. इतिहासातल्या या घटनेवर आधारित चित्रपट हिरकणी. या चित्रपटात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने हिरकणीची भूमिका साकारली आहे, तर प्रसाद ओक आणि अमित खेडेकर हेही मुख्य भूमिकेत आहेत. प्रसाद ओक यांनी अभिनयाबरोबरच या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने इतिहासातील ही कणखर आई प्रेक्षकांसमोर आली. सोनी मराठी वाहिनीने देखील आपल्या मालिकांमधून स्त्रीची कणखर बाजू दाखवण्याचा सतत प्रयत्न केला आहे. सोनी मराठी वाहिनी नेहमीच वेगळ्या धाटणीच्या मालिकांमधून स्त्रियांना मानवंदना देत असते. स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या जिजामाता असु दे किंवा स्त्री शिक्षणासाठी झटणाऱ्या सावित्रीबाई सोनी मराठी वाहिनीच्या मालिकांनी सतत स्त्री शक्तीला महत्व दिलं आहे. अशा स्त्रीशक्तीचा जागर आपणही करू या सोनी मराठीच्या साथीने. तेव्हा या स्त्रीसामर्थ्याचे मूर्तिमंत उदाहरण असणाऱ्या ‘हिरकणी’चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमिअर नक्की पाहा ‘महिला दिन विशेष’  ८ मार्च रोजी दु. १ वाजता आणि संध्या. ७ वाजता, फक्त सोनी मराठीवर.

Leave a Reply