चित्रपटामध्ये हास्य आणि विनोद याची छान पर्वणी पाहायला मिळणार हे टिझर पोस्टर पाहून लक्षात येत आहे. जय आणि वीरू च्या या छान जोडीचं मराठी पडद्यावरच “झोलझाल” रूप पाहायला धम्माल येणार हे नक्की. “झोलझाल” मधल्या जय वीरू चं पडद्यावरील नातं जितक सुंदर पाहायला मिळतंय तितकच पडद्यामागेही त्यांनी धम्माल केली असावी असं पोस्टरच्या झलक मधे दिसून येतंय. “झोलझाल”चे जय वीरू, अमोल कांगणे आणि ऋतुराज फडके म्हणतात “ऑन स्क्रीन बंध तेव्हाच रंगत आणतात जेव्हा ऑफ स्क्रीन मैत्री तेवढीच जवळची आणि रंजक असते.” येत्या १ मे ला तुम्हाला पडद्यावर ती पाहायला मिळेलच. शूट दरम्यान आमची ओळख झाली. या चित्रपटाने आम्हाला मैत्री दिली. जय आणि वीरू या गाजलेल्या जोडीला पुन्हा नव्या रूपात सादर करण्याची संधी “झोलझाल”मुळे आम्हाला मिळाली. शूट दरम्यान आम्ही खूप धम्माल केली. सेटवर सगळ्यांसोबत खूप खोड्या देखील केल्या कदाचित त्याचमुळे हा चित्रपट करताना सर्वच कलाकारांना मज्जा आली आणि आम्हाला जय वीरू साकारताना मदत झाली. मनोरंजनाचा गुलदस्ता आणि विनोदचा हास्यकल्लोळ घेऊन लवकरच आम्ही जय वीरूच्या रूपात तुमच्या भेटीला येऊ.”
‘झोलझाल’ या चित्रपटाची निर्मिती गोपाळ अग्रवाल, आनंद गुप्ता आणि संजना जी. अग्रवाल यांनी केली असून, सारिका ए. गुप्ता, विनय अग्रवाल हे चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. तर रश्मी अग्रवाल, स्वप्नील गुप्ता यांनी क्रिएटिव्ह प्रोड्युसर काम पाहिले असून अमोल कांगणे, आर्णव शिरसाट सहयोगी निर्माता आहेत. या चित्रपटाचे कार्यकारी निर्माता शिवाजी डावखर असून मानस कुमार, संजीव सोनी आणि आनंद गुप्ता यांनी चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद लिहिले आहे.
झोलझालच्या ऑफ स्क्रीन गमतीजमती ऑन स्क्रीन खूप सारी धम्माल घेऊन येणार आहेत. नक्की काय आहे हा झोल झाल पाहायला १ मे ला नक्की आपल्या जवळच्या चित्रपटगृहाला भेट द्या.