मंजु – शौनकच्या आयुष्याला लागणार नवं वळण


मंजु-शौनकच्या प्रेमाचा अंकुर फुलणार इतक्यात त्यांच्या नात्याला कुणाची तरी नजर लागली आणि या नात्यात दरी निर्माण झाली. एकमेकांपासून दुरावलेली ही मनं आता तब्बल ४ वर्षांनी पुन्हा आमने – सामने येणार आहेत. या ४ वर्षांत हे दोघेही आपआपल्या आयुष्यात खूपच पुढे निघून गेले आहेत. शौनक एक यशस्वी बिझनेसमॅन झाला आहे तर मंजुने आपलं स्वप्न पूर्ण करत वकीली पेशा स्वीकारला आहे.आणि आता ते एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत .
हे सगळंच नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. ज्यात, कोर्टात मंजु – शौनकचा आमना-सामना होतो, शौनक मंजुला वकीली वेशात पाहून स्तब्ध होतो आणि तितक्यात एक बाळ मंजुला मम्मा अशी हाक मारतं आणि शौनक अजूनच अचंबित होतो. वकीली पेशातील नवी आव्हानं तर दुसरीकडे आई ची भूमिका निभावण्यात मंजू कशी यशस्वी होणार?, मंजु-शौनकचं प्रेम पुन्हा फुलणार का? आणि गुंतलेलं हे नातं सुटणार का?
हा सगळा प्रवास येत्या २२ जुलै पासून आपल्याला पाहायला मिळणार आहे , तर पाहत रहा ‘ती फुलराणी’ फक्त सोनी मराठीवर.
https://www.youtube.com/watch?v=u5JuSCfSQGU
Leave a Reply
You must be logged in to post a comment.