Marathi NewsVideos

‘जवानी झिंदाबाद’ चा टीजर प्रदर्शित

jawani zindabad

जवानी झिंदाबाद’ म्हटलं की आपल्या नजरेसमोर तरुणाईचा जल्लोष, उत्साह येतो. नव्या दमाचे कथानक असलेल्या ‘जवानी झिंदाबाद’ या मराठी चित्रपटाचा टीजर नुकताच सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आला आहे. शिव कदम दिग्दर्शित, महाराष्ट्र मोशन पिक्चर्स व एम के एंटरटेनमेंट प्रस्तूत ‘जवानी झिंदाबाद’ या चित्रपटाची निर्मिती नितीन उत्तमराव साठे यांनी केली असून सहनिर्माता नरेंद्र चंद्रकांत यादव (पाटील) आहेत.

एका सत्य घटनेवर आधारित या चित्रपटात हृदयस्पर्शी प्रेमकथा बघायला मिळणार आहे. आजपर्यंत मोठ्या पडद्यावर न आलेल्या संवेदनशील विषयाभोवती गुंफण्यात आलेल्या या चित्रपटातून अभिषेक साठे हा नवा चेहरा मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे, तर अभिनेत्री केतकी नारायण नायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय यतीन कार्येकर, आसावरी जोशी, मधू कांबीकर, पूर्वा शिंदे, सचीन गवळी, अभ्यंग कुवळेकर यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत.

‘जवानी झिंदाबाद’ या चित्रपटाला कृणाल देशमुख आणि साहील कुलकर्णी  यांनी संगीतबद्ध केले असून आदर्श शिंदे, स्वप्नील बांदोडकर, जसराज जोशी, हृषीकेश रानडे, सावनी रविंद्र, ज्युईली जोगळेकर, दिपांशी नागर यांच्या सुमधुर आवाजातील गाणी रसिकांना ऐकायला मिळणार आहेत. या चित्रपटाची कथा नितीन उत्तमराव साठे यांची असून पटकथा लेखन आणि दिग्दर्शन शिव कदम यांनी केले आहे. छायांकन करण तांदळे यांचे तर कलादिग्दर्शन वासू पाटील यांचे आहे. अभिषेक साठे आणि केतकी नारायण यांच्यातील पडद्यावर दिसणाऱ्या रोमान्समुळे हा टीजर आपले लक्ष वेधून घेतो. ‘जवानी झिंदाबाद’ हा चित्रपट येत्या १३ डिसेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Back to top button