अनुकंपातत्व सारख्या महत्वाच्या विषयावर आधारित वडील आणि मुलीचा अनोखा प्रवास
गेले काही दिवस बाबांच्या ज्या राजकन्येविषयी सर्वत्र चर्चा चालली होती ती राजकन्या आता प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. साधी, मध्यमवर्गीय, मनमिळावू अशी राजकन्येच्यारुपातून ‘अवनी जयराम भोसले’ छोट्या पद्यावर आपल्याला दिसली आणि अगदी पहिल्याच एपिसोड पासूनच तिने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत .सोनी मराठी वरील ‘एकहोती राजकन्या’ या नवीन मालिकेचा पहिला एपिसोड नुकताच प्रदर्शित झाला आहे . अभिनेते किशोर कदम आणि अभिनेत्री किरण ढाणे यांच्या अभिनयाने सुरुवात झालेल्याया मालिकेच्या पहिल्या एपिसोडमध्येच एकंदरीत वडील आणि मुलीच्या गोड नात्याची गुंफण पाहायला मिळत आहे.
नेहमी डॉक्टर बनून समाजसेवा करण्याचं स्वप्नं पाहणा-या अवनीचा कॉन्स्टेबल म्हणून प्रवासाला सुरुवात झाली आहे.आणि ती नुकतीच अनुकंपातत्वावर पोलीस खात्यातभरती झाली आहे . अनुकंपा तत्व म्हणजे शासकीय सेवेत असताना दिवंगत किंवा अकाली सेवानिवृत्त झालेल्या कर्मचा-यांच्या नातेवाईकांची त्यांच्या ठिकाणी कामकरण्यासाठी नियुक्ती केली जाते. बाबांचं छत्र हरवल्यामुळे त्यांच्या जागी अनुकंपा तत्वावर आपल्या अवनीची नियुक्ती झाली आहे. बाबांचं छत्र हरवल्यानंतर खंबीर बनूनअवनी सर्व जबाबदा-या योग्य रितीने पार पाडण्याच्या प्रयत्नात आहे. बाबांची शिकवण आणि त्यांच्या कर्तबगारीमुळे त्यांच्यातील गुण हे अवनीमध्ये देखील आपसूक आलेआहेत. अवनीचा मदतीला धावून जाण्याचा स्वभाव आणि रोखठोकपणे आपली मतं मांडण्याचा स्वभाव प्रेक्षकांनी नक्की अनुभवला असेल. अश्या ह्या बाबांच्या लाडक्याराजकन्येचा एक अनोखा प्रवास नक्की पहा. तिच्या प्रवासात सहभागी होण्यासाठी पाहत राहा ‘एक होती राजकन्या’ सोमवार ते शनिवार सायंकाळी ७:३० वाजता फक्त सोनीमराठीवर.