Marathi News

येत्या रविवारी सोनी मराठीवर लुटा आस्वाद मराठी लोकसंगीताचा

जल्लोष लोकसंगीताचा
जल्लोष लोकसंगीताचा

येत्या १४ एप्रिल रोजी तुमची दुपार आणि संध्याकाळ लोकसंगीताच्या मैफलीने रंगणार आहे. सोनी मराठी रसिक प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे ‘जल्लोष लोकसंगीताचा’! प्रसिद्ध गायक आनंद शिंदेंच्यालोकगीतांवर मराठी टीव्हीवरील सेलिब्रिटीज धमाल नृत्याचा बार उडवून देणार आहेत. त्यामुळे अस्सल मराठी लोकसंगीत आणि लाजवाब डान्स परफॉर्मन्सेस असा दुहेरी आनंद रसिकांना लुटतायेणार आहे.

मराठी संस्कृतीचे वैभव म्हणजे इथल्या लोककला.  त्यात कोल्हापूरची रांगडी माती म्हणजे महाराष्ट्राच्या लोककलांचे आगर आणि मराठी चित्रपटतारकांचे माहेरघर.. कुस्ती, लावणी, तमाशा, पोवाडे, सिनेमा अशा लोककलांनी कोल्हापूर नगरी नटली आहे. म्हणूनच कोल्हापूरकर सगळ्या उत्सवांचं दणक्यात सेलिब्रेशन करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. अशा या उत्साही मातीतला झणझणीत सोहळा सोनीमराठी आपल्यासाठी खास टीव्हीवर घेऊन येत आहे. डान्स, कॉमेडी, संगीताची या शोमध्ये रेलचेल असणार आहे. विनोदवीर पॅडी आणि वनिता खरात यांचे पोट धरून हसवणारे किस्से, आनंदशिंदेंची सुपरहिट गाणी आणि ‘एक होती राजकन्या’ मधील राजकन्या किरण ढाणे आणि इतर दिग्गज कलाकारांचे बहारदार डान्स यामुळे या कार्यक्रमाचा बेत कोल्हापुरी तांबड्या पांढऱ्यारस्श्यासारखा फक्कड जुळून येणार! कोल्हापूरकरांनी या शोला तुफान गर्दीसह प्रतिसाद दिला आहे. गायक आनंद शिंदेंनी कार्यक्रमाला मिळालेल्या अफाट यशासाठी सर्व कलाकारांचे व रसिक प्रेक्षकांचेआभार मानले आहेत. खास लोकसंगीतासाठीचा हा विशेष सोहळा म्हणजे एक दुर्मिळ योगच आहे.

कोल्हापूरात झालेल्या या धमाल कार्यक्रमाचा आस्वाद रसिकांना येत्या रविवारी घरबसल्या घेता येईल. हा अभूतपूर्व सोहळा पहायला विसरू नका १४ एप्रिल रोजी दु. १ आणि सा. ७ वाजता फक्त सोनीमराठीवर.

Related Articles

Leave a Reply

Back to top button