Marathi News

No Smoking Papa Song : यंदा करा ‘नो स्मोकिंग’ नववर्षाचा संकल्प – शान

No Smoking Papa Teaser

 

नववर्षाचा नवा संकल्प करण्याचा रिवाज आहे. आणि बरेचजण आपल्या प्रकृतीविषक काही ना काही संकल्प करत असतात. ह्यामुळेच सुप्रसिध्द गायक शान ह्यांना यंदा सर्व पालकांनी ‘नो स्मोकिंग’ हाच संकल्प करून आपल्या मुलांना नववर्षाची एक आगळी भेट द्यावी असं वाटतंय.

सूत्रांनूसार, शानच्या बालपणीच कँसरमूळे त्यांचे वडिल देवाघरी गेले होते. त्यामूळे लहानपणापासूनच ‘तंबाखूविरोधा’चा समर्थक असलेल्या शानने नेहमीच आपल्या आप्तेष्ठांना आणि सहकार्यांना तंबाखू उत्पादनांपासून दूर राहण्यासाठी आणि धूम्रपान न करण्यासाठी प्रोत्साहन दिले होते. आता दोन मुलांचा पिता असलेले शान सर्वच पालकांसाठी ‘नो स्मोकिंग’चा संदेश देणारे ‘नो स्मोकिंग पापा’ हे गाणे घेऊन आले आहेत.

व्हिडियो पॅलेसची प्रस्तुती असलेले डॉ. दीपा सुरेंद्र देसाई आणि अनुराज फास्टनर्स प्राइवेट लिमिटेड, आणि एडलिब्स प्रॉडक्शन्सचे ‘नो स्मोकिंग पापा’ हे गाणे प्रितीश कामतने लिहिले आहे. शानने गायलेल्या ह्या गाण्याला मितेश-प्रितेशने संगीतबध्द केलेले आहे. हे गाणे नुकतेच लाँच झाले आहे.

गाण्याविषयी गायक शान म्हणतात, “नो स्मोकिंग पापा पेक्षा जास्त चांगला नव्या वर्षाचा संकल्प काय असू शकतो? जर एकाही पित्याने आपल्या मुलांसाठीधूम्रपान करणे सोडले, तर ह्या व्हिडीयोचा उद्देश पूर्ण होईल असं मला वाटतं मग ते एक्टिव स्मोकिंग असो की पॅसिव्ह स्मोकिंग दोन्हीचा आपल्या प्रकृतीवर दुष्परिणाम होतो. आणि आपल्या मुलांवर आणि कुटूंबावर प्रेम करणा-या प्रत्येक पालकाने ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी.”

निर्माते तुषार देसाई म्हणतात, “दोन वर्षांपूर्वी मी सतत धूम्रपान करायचो. पण माझ्या मुलाने अनुजने मला धुम्रपान सोडण्यासाठी प्रेरित केले. ‘नो स्मोकिंग पापा’अनुजनेच पुढाकार घेतलेले प्रोजेक्ट आहे.  आणि त्यासाठी सुप्रसिध्द गायक शानने आवाज द्यावा ह्यासारखी आनंदाची गोष्ट नाही. आणि मला पूर्ण विश्वास आहे की, ह्या व्हिडीयोनंतर अनेक पालक आपल्या मुलांसाठी धूम्रपान करणे सोडतील.”

Related Articles

Leave a Reply

Back to top button