Home > Marathi News > ‘स्माईल प्लीज’ च्या सेटवर ललितचा चान्स पे डान्स

‘स्माईल प्लीज’ च्या सेटवर ललितचा चान्स पे डान्स

Lalit

मराठी चित्रपटसृष्टीतला हँडसम, डॅशिंग अभिनेता म्हणून ललित प्रभाकरकडे पाहिले जाते. नेहमीच वैविध्यपूर्ण भूमिका उत्तमरीत्या साकारणारा ललित लवकरच विक्रम फडणीस दिग्दर्शित ‘स्माईल प्लीज’ या चित्रपटात दिसणार आहे. विक्रम फडणीसने ललितचे काम याआधी पहिले होते आणि तेव्हाच असे ठरवले होते, की माझ्या पुढच्या चित्रपटात ललित असणार आणि विक्रम फडणीस यांनी त्यांचा शब्द पाळला. आयुष्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघणारा, प्रत्येक क्षणाचा आनंद लुटणारा आणि व्यवसायाने ग्राफिक डिझायनर असणाऱ्या तरुणाची भूमिका ललित ”स्माईल प्लीज’ या चित्रपटात साकारत आहे. ‘आनंदी गोपाळ’ या चित्रपटामध्ये साकारलेल्या  कणखर, कडक, शिस्तप्रिय अशा गोपाळरावांच्या भूमिकेच्या एकदम विरुद्ध अशी भूमिका ललित ‘स्माईल प्लीज’ या चित्रपटात साकारत आहे.
या निमित्ताने ललितला तो खऱ्या आयुष्यात जसा आहे, तशीच भूमिका साकारण्याची संधी मिळाली. चित्रीकरणादरम्यान ललित सिनेमाच्या सेटवर खूप धमाल, मजा, मस्ती करायचा. त्यातलाच एक किस्सा म्हणजे ‘स्माईल प्लिज’ चित्रपटात गणपती मिरवणुकीचा एक सीन आहे. सीन संपल्यावर, दिग्दर्शकाने ओके दिल्यानंतर ललित त्या मिरवणुकीत सामील झाला आणि मनसोक्त नाचला. यात तो एकटाच नाचला नाही तर त्याने सेटवरील सहकलाकार, तंत्रज्ञ यांच्यासह सगळ्यांनाच नाचण्यास भाग पाडले आणि सेटवरील संपूर्ण वातावरणच बदलून गेले. त्यामुळे सगळ्यांचाच उत्साह द्विगुणित होऊन नव्या जोमाने परत सर्व कामाला लागले. एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत, सनशाईन स्टुडिओच्या सहयोगाने, हॅशटॅग फिल्म स्टुडिओ आणि क्रित्यावत प्रॉडक्शन निर्मित ‘स्माईल प्लीज’ हा चित्रपट १९ जुलै रोजी प्रदर्शित होत आहे.  या चित्रपटात ललित प्रभाकरसोबत मुक्ता बर्वे, प्रसाद ओक, अदिती गोवित्रीकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

About justmarathi

Check Also

Happy Birthday Sai Tamankar

सई ताम्हणकरच्या वाढदिवशी फुलले 100 गरजू मुलांच्या चेह-यावर हास्य

  अभिनेत्री सई ताम्हणकर जेवढे रूपेरी पडद्यावर सुंदर, सशक्त आणि संवेदनशील अभिनेत्री आहे. तेवढीच ती …

Leave a Reply