Marathi NewsMarathi Trends

नवरी मिळे नवऱ्याला’, ७ ऑक्टोबर पासून रात्री ८ वाजता, फक्त सोनी मराठीवर

Navri mile navryaala

यंदा पावसाळा महाराष्ट्रावर पुरता बरसला असला, तरी मराठवाडा मात्र तहानलेला आहे. दुष्काळग्रस्त मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच मराठवाड्यात उद्भवली आहे एक नवी

समस्या आणि ही समस्या आहे एका आईची.  लग्नाचं वय पार केलेल्या या आईच्या ४ मुलांसाठी काही केल्या मुलगी मिळत नाहीये.  सोनी मराठीवर सुरू होणाऱ्या नवरी मिळे नवऱ्याला या नव्या मालिकेतून ही समस्या प्रेक्षकांसमोर येणार आहे. आता तरी ठरलं पाहिजे, घर सुनांनी भरलं पाहिजे, एवढीच इच्छा असणाऱ्या या माउलीला मराठवाड्यातली परिस्थिती काही साथ देत नाही. एकीकडे नंदी बैलानं डोलावलेली नकारार्थी मान तर दुसरीकडे विवाह संस्थेकडून आलेला नकार, हे सगळं पचवून या वर्षी आपल्या मुलांची लग्नं करणारच, असा निश्चय तिनं केला आहे.

सामाजिक समस्या विनोदी शैलीनं मांडण्यात हातखंडा असणारे दिग्दर्शक समीर पाटील या मालिकेचं दिग्दर्शन करणार आहेत. समीर पाटील यांनी मांडलेली या आईची व्यथा पाहताना धमाल येणार, हे

नक्की. तेव्हा सूनबाई येती घरा, तोची दिवाळीदसरा अशी अवस्था झालेल्या या आईची सासूबाई

होण्याची इच्छा कधीआणि कशी? पूर्ण होणार हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका ‘नवरी मिळे नवऱ्याला’, ७ ऑक्टोबर पासून रात्री ८ वाजता, फक्त सोनी मराठीवर.

Related Articles

Leave a Reply

Back to top button