Marathi News

बिग बॉसच्या घरात जाण्याअगोदर माधव देवचकेने केली होती जय्यत तयारी

Maadhav

 

अभिनेता माधव देवचकेची ओळख ‘मोस्ट बॅलेन्स्ड बिग बॉस कंटेस्टंट’ अशी आहे.  माधवची त्याच्या चांगल्या वागणूकीमूळे आणि परफेक्ट ड्रेसिंग सेन्समूळे सध्या सोशल मीडियावरून बरीच वाखाणणी होतेय. बिगबॉसच्या घरात राहायला जाऊन आता माधवला एक महिना झाल्यावर दर ‘विकेन्डच्या वार’च्या वेळी त्याने घातलेल्या एथनिक कपड्यांवरूनही माधवची ह्या अनोख्या खेळासाठीची पूर्वतयारी दिसून येतेय.

माधवची पत्नी बागेश्री ह्याविषयी सांगते, “माझ्या मते, गेल्या एकमहिन्यातले सर्व पुरूष कंटेस्टंटचे कपडे पाहता, माधवचं सर्वाधिक पूर्वतयारीनिशी आणि आपल्या घरातल्या वास्तव्याविषयी क़ॉन्फिडंट असलेला एकमेव पुरूष खेळाडू आहे. माधवला एखादी भूमिका रंगवताना, त्या व्यक्तिरेखेची बोलण्या-चालण्याची ढब, संवादफेक, कपडेपट ह्यावर काम करून पूर्वतयारी करण्याची सवय आहे. जशी तो आपल्या एखाद्या मालिकेसाठी किंवा सिनेमातल्या भूमिकेसाठी तयारी करतो, तसाच बिग बॉसच्या घरात जातानाही तो पूर्वतयारीनिशी गेला होता.”

बागेश्री सांगते, “एक अभिनेता असल्याने माधवला स्क्रिनवर कसे कपडे घालावे, ह्याची उत्तम जाण आहे. कलर कॉम्बिनेशन कसे असावे, आपल्याला कसे कपडे शोभून दिसतील हे त्याला चांगले माहित आहे. त्यामूळे त्याने स्वत:साठी कपड्यांची निवडही तशीच केली. त्याने एवढे चांगले कपडे बिगबॉसमध्ये जाण्यासाठी निवडले की, मी त्याला एक फोटोशूटच करून घ्यायला सांगितले. ब-याच कालावधीत माधवने स्वत:साठी फोटोशूट केल नव्हते. त्यामूळे त्यालासूध्दा ही कल्पना आवडली. आणि त्याने प्रोफेशनल फोटोग्राफरकडून स्वत:चे फोटोशूट करून घेतले. मला असं वाटतं, बिगबॉसच्या घरात एवढ्या पूर्वतयारीनिशी गेलेला तो एकमेव सदस्य असावा. ”

Related Articles

Leave a Reply

Back to top button