Marathi News

अश्विनी भावे ह्यांनी अमेरिकेत कुटूंबासोबत सेलिब्रेट केला वाढदिवस !

Ashvini Bhave bday celebration

सेलिब्रिटींचा वाढदिवस हा त्यांच्या चाहत्यांसाठी ब-याचदा दिवाळी-दस-यासारखाच असतो. बॉलीवूड सेलेब्सच्या वढदिवसाला त्यांच्या घराबाहेरची गर्दीही आता आपल्याला नित्याचीच झालेली आहे. लग्नानंतर अमेरिकेत स्थायिक झालेल्या अभिनेत्री अश्विनी भावे मात्र आपल्या  वाढदिवसाला मोठ-मोठ्या पार्टीज न करता, दरवर्षी वाढदिवस खूप साध्या पध्दतीने आणि घरगुती पध्दतीने सेलिब्रेट करणंच पसंत करतात.

यंदाही त्यांनी आपल्या पती आणि मुलांसहच आपला वाढदिवस साजरा करणं पसंत केला. अमेरिकेतून आपल्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनविषयी सांगताना त्या म्हणाल्या,” मला आपल्या कुटूंबासोबत वेळ घालवायला खूप आवडतो. माझी मुलगी दरवर्षी माझ्या वाढदिवसाला केक बनवते. सॅनफ्रान्सिसकोच्या ‘बे एरिया’त आमचे बाकीचे फॅमिली मेंबर्स वास्तव्याला आहेत. आम्ही सगळे एकत्र येऊन सेलिब्रेशन करतो. आणि ह्या सगळ्यावर ‘टॉपिंग ऑफ दि केक’ सारखं असतं, सर्वात शेवटंच पण महत्वाचं म्हणजे, रात्री नव-यासोबत डिनर डेटला जाणं.”

लहानपणीच्या आपल्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनबाबतच्या त्या आठवणी सांगताना हसून म्हणतात, “माझा वाढदिवस मे महिन्यात येत असल्याने त्यादिवशी घरी आमरस बनवायचा रिवाज होता. जो मला आवडायचा नाही. आणि मी खूप चिडायचे.”

Related Articles

Leave a Reply

Back to top button