Marathi News

‘लव्ह यु जिंदगी’: सचिन पिळगांवकर आणि प्रार्थना बेहरे पहिल्यांदाच करणार स्क्रिन शेअर

2561cf80 1399 4acd af8b 1b1c9ed02dde

तर आपल्या हास्याने आणि सहज-सुंदर अभिनयाने सर्वांची मनं जिंकणारी अभिनेत्री प्रार्थना बेहरे या चित्रपटातसचिन पिळगांवकर यांच्यासोबत
महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. नवीन पोस्टरच्या माध्यमातून या चित्रपटातील प्रार्थना बेहरेचा लूक नक्की कसा असेल याचा अंदाज तुम्हांला आता आलाआहे. प्रार्थनाने आतापर्यंत अनेक चित्रपटांतून  वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत आणि तिच्या अभिनयाला प्रेक्षकांनीही देखील सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

‘लव्ह यु जिंदगी’मधील कूल आणि स्टायलिश लूकमधून प्रार्थना तिच्या चाहत्यांना एका आगळ्या-वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे आणि तिच्या
भूमिकेची झलक आपल्याला लवकरच टीझरमधून दिसेल. पुन्हाएकदा प्रेक्षकांची चित्रपटाविषयी असलेलीकुतुहलता लक्षात घेता या चित्रपटाचा टीझर लकरच प्रदर्शित करण्यात येणार आहे. तसेच आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे नवीन आशय आणि नवीनविषय असलेल्या ‘लव्ह यु जिंदगी’ या चित्रपटाच्या निमित्ताने प्रार्थना बेहरे आणि सचिन पिळगांवकर पहिल्यांदाच एकत्र काम करत असल्यामुळे या चित्रपटाच्या माध्यमातून काहीतरी नवीन,रंजक प्रेक्षकांना पाहायला मिळणाआहे.

या चित्रपटातून सचिन पिळगांवकर कारलेल्या अनिरुध्द दातेच्या आयुष्यातील गंमती जमती अनुभवायला मिळतील आणि त्याचसोबत प्रार्थनाचा
पुन्हा एकदा नटखट स्वभावदेखील पाहायला मिळणार आहे.
सचिन बामगुडे निर्मित ‘लव्ह यु जिंदगी’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनासह मनोज सावंत यांनी चित्रपटाची कथा देखील लिहिली असून येत्या १४ डिसेंबरला आयुष्यावरनव्याने प्रेम करायला लावणारा ‘लव्ह यु जिंदगी’ संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button