अभय महाजन आणि दिप्ती सती आहेत संजय जाधव ह्यांचे ‘लकी’ कलाकार !
संजय जाधव ह्यांनी आपल्या लकी सिनेमाची घोषणा केल्यावर त्यामधले कलाकार कोण असतील ह्याविषयी गेले कित्येक दिवस सिनेसृष्टीत उत्सुकता होती. सई ताम्हणकर, उमेश कामत, तेजस्विनी पंडित, सिध्दार्थ जाधव, स्पृहा जोशी, श्रेया बुगडे, सोनाली खरे ह्या कलाकारांनी तेच ‘लकी’ असल्याचे जाहिर केले.
मात्र आता खुद्द संजय जाधव ह्यांनी त्यांच्या सिनेमातल्या लकी कलाकारांची घोषणा केली आहे. अभिनेता अभय महाजन आणि अभिनेत्री दिप्ती सती आपल्या सिनेमाचे हिरो-हिरोइन असल्याची घोषणा संजय जाधव ह्यांनी सोशल मीडियाव्दारे केली आहे.
वैशिष्ठ्य म्हणजे, आपल्या कलाकारांना लाँच करताना त्यांनी एक गाणेच चित्रीत केले आहे. ह्याविषयी निर्माते सुरज सिंग म्हणतात, “हेच तर दादांचे वैशिष्ठ्य आहे. दादा नेहमी काहीतरी वेगळे करतात. त्यांनी त्यांच्या मागच्या सिनेमाचा टिझर 60 कॅमे-यांनी चित्रीत केला होता. तर आता आमच्या सिनेमाचे हिरो-हिरोइन लाँच करताना हे धमाल गाणे दादांनी त्यांच्या स्टाइलने चित्रीत केले आहे. आता जेवढे गाणे एन्टरटेनिंग आहे. त्यापेक्षाही अधिक धमाल तुम्हांला हा चित्रपट पाहताना येईल, ह्याचा मला पूर्ण विश्वास आहे.”
‘अहो, दादा आता सांगा नंबर कुणाचा आला’ ह्या गाण्याचे गीत सचिन पाठक ह्यांनी लिहिले आहे. तर पंकज पडघन ह्यांनी ते संगीतबध्द केले आहे. अमितराज, सायली पंकज आणि रोहित राऊत ह्यांनी हे धमाल गाणे गायले आहे. उमेश जाधव ह्यांनी गाण्याची कोरीओग्राफी केली आहे.
‘बी लाइव्ह प्रॉडक्शन्स’ आणि ‘ड्रिंमींग ट्वेंटीफोर सेव्हन’ निर्मित, संजय कुकरेजा, सुरज सिंग आणि दिपक पांडुरंग राणे ह्यांची निर्मिती असलेला, अभय महाजन आणि दिप्ती सती ह्यांच्या अभिनयाने सजलेला, संजय जाधव दिगदर्शित ‘लकी’ चित्रपट 7 डिसेंबर 2018 ला महाराष्ट्रातल्य सर्व सिनेमागृहांमध्ये झळकणार आहे.