Marathi News

‘महानायका’सोबत झळकला राहुल पेठे

RAHUL PETHE

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता म्हणजे राहुल पेठे. हिंदी वेबसिरीज, चित्रपटांमधून राहुलने त्याच्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे आणि आता राहुल बॉलिवूडचे ‘महानायक’ अमिताभ बच्चन यांच्यासोबत एका जाहिरातीतून झळकला आहे. प्रत्येक कलाकाराला  त्याच्या कारकिर्दीत अशा ‘महान’ कलाकारांसोबत काम करण्याची इच्छा ही असतेच आणि राहुलची ही इच्छा ‘कौन बनेगा करोडपती’ या जाहिरातीच्या माध्यमातून पूर्ण झाली आहे. आपल्या या अनुभवाबद्दल राहुल म्हणतो, इतके मोठे अभिनेता असूनही ‘मी’ पणाचा लवलेश त्यांच्यात जराही नव्हता.अफाट व्यक्तिमत्व आहे त्यांचे. अशा कलाकारांसोबत काम करण्याची संधी मला मिळाली यासाठी मी आमचे दिग्दर्शक विजय मौर्य सरांना धन्यवाद देईन. भविष्यातही मला त्यांच्यासोबत आणखी काम करण्याची संधी मिळावी. आणि पुढे अनेक चांगली कामं माझ्याकडून व्हावी अशी इच्छा आहे..
राहुलचा नुकताच ‘१५ ऑगस्ट’ नावाचा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. प्रेक्षकांनी या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद दिला. लवकरच राहुल ‘मनाचे श्लोक’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या निमित्ताने तो पुन्हा एकदा मृण्मयी देशपांडेसोबत पडद्यावर झळकणार आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Back to top button