Marathi News

व्हिडीयो पॅलेस, पुष्कर जोग आणि सलिम मर्चंट यांची सेलिब्रेशन स्पेशल ‘झिल मिल’

JhilMil Marathi Song Album
ख्रिसमस आणि न्यु इयर सेलिब्रेशनच्या तयारीला आता सगळीकडे सुरुवात झाली आहे. सेलिब्रेशन तितक्याच हटके आणि डान्सिंग स्टाईलने करण्यासाठी व्हिडीयो पॅलेसचे डान्सिंग नंबर ‘झिल मिल’ आता प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.  ‘बेखबर कशी तू’ या रोमँटिक गाण्याने अनेकांना प्रेमात पाडल्यानंतर व्हिडीयो पॅलेस सेलिब्रेशन स्पेशल ‘झिल मिल’ या गाण्यावर प्रत्येकाला थिरकायला भाग पाडणार.
गुझबम्प्स एंटरटेनमेंट आणि व्हिडीयो पॅलेस प्रस्तुत ‘झिल मिल’ या डान्सिंग नंबरवर पुष्कर जोगचा रॉकिंग अंदाज पाहायला मिळणार आहे. अभिनयासोबत पुष्कर हा त्याच्या डान्ससाठी पण तितकाच प्रसिध्द आहे आणि पुष्करला डान्सची किती क्रेझ आहे आणि मनापासून आवड आहे हे आपण अनेकदा शो, चित्रपटांतून पाहिलंय. त्यामुळे पुष्करची ‘झिल मिल’ ही त्याच्या चाहत्यांसाठी स्पेशल ट्रिट असेल.
या गाण्यातील अभिनेता, गायक, संगीतकार आणि लोकेशन्स हे ‘झिल मिल’चे वैशिष्ट्ये आहेत. गायक सलिम मर्चंट यांनी त्यांच्या रॉकिंग आवाजाने या गाण्यात जाण आणली असे म्हणायला हरकत नाही. बॉलिवूडमध्ये सलिम मर्चंट यांनी प्रेक्षकांना सुपरहिट गाणी दिली आहेत, त्यामुळे त्यांच्या आवाजातील ‘झिल मिल’ हे गाणं मराठी प्रेक्षकांसाठी एक खास न्यू इयर भेट आहे. यंग आणि टॅलेंटेड अभिनेत्री-गीतकार अदिती द्रविड हिने या गाण्याचे बोल लिहिले असून साई-पियुष या जोडीने या गाण्याला म्युझिक दिले आहे.
आता मराठी सिंगल गाण्यांचे शूटिंग देखील परदेशात व्हायला लागले आहेत, ही आपल्या प्रत्येकासाठी कौतुकाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. ‘झिल मिल’ या गाण्याचे ऑस्ट्रेलियामधील मेलबर्न आणि सिडनीच्या नयनरम्य ठिकाणी शूट झाले आहे. त्यामुळे या व्हिडीयो गाण्यामधून प्रेक्षकांची मेलबर्न आणि सिडनीस सफारी होणार हे नक्की.
चला तर मग पुष्करसोबत ‘गेट ऑन दि बीट’ होऊन, या डान्सिंग नंबरवर थिरकत आणि ‘झिल मिल’ करत करुया ख्रिसमस आणि न्यू इयरचे सेलिब्रेशन.

Related Articles

Leave a Reply

Back to top button