खरी ‘पूर्वी’ शोधण्यासाठी चिन्मयची शक्कल

CHINMAY AND RIKU IN MAKEUP

रिंकूच्या ‘मेकअप’चे प्रतिबिंब आपण नुकतेच ‘मेकअप’ चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरमध्ये पाहिले. आता या सिनेमाचे दुसरे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये चिन्मय उदगीरकर आणि रिंकू राजगुरू  दिसत आहे. या पोस्टरमध्ये चिन्मयच्या भूमिकेवरून पडदा उठवण्यात आला असून, डॉक्टरांच्या वेशभूषेत असलेला चिन्मय स्टेट्स्कोप घेऊन ‘पूर्वी’चे म्हणजेच रिंकूचे डोके तपासताना दिसत आहे. खरी ‘पूर्वी’ कोणती हे शोधण्यासाठी तर चिन्मय तिला तपासात नसावा ना? दोन वेगवेगळी रूपे घेऊन वावरणाऱ्या ‘पूर्वी’ला कोणत्या गोष्टीमुळे असे सोंग करावे लागत आहे हे आपल्याला चित्रपट पाहिल्यावर समजेलच. तत्पूर्वी चिन्मय ‘पूर्वी’ला तिच्या या सोंगात मदत करणार की त्याला विरोध करणार हे बघण्यासाठी आपल्याला थोडी वाट पाहावी लागणार आहे.

सोहम रॉकस्टार एंटरटेनमेंट, बाला इंडस्ट्रीज अँड एंटरटेनमेंट प्रा. लि., शेमारू एंटरटेनमेंट लि. निर्मित आणि ग्रीन ॲपल मीडिया प्रस्तुत ‘मेकअप’ या चित्रपटात रिंकू राजगुरू सोबतच चिन्मय उदगीरकर प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. दीपक मुकूट, बी. बालाजी राव, हिरेन गाडा, नीरज कुमार बर्मन, अमित सिंग यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून केतन मारू, कलीम खान सहनिर्माता आहेत. गणेश पंडित दिग्दर्शित, लिखित ‘मेकअप’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

About justmarathi

Check Also

Samatar Marathi Web Series

“समांतर” पहिलीवहिली बहुभाषिक मराठी वेबसिरीज

Samatar Marathi Web Series: एकाचा भूतकाळ दुसऱ्याच भविष्य असेल तर काय घडू शकत? या आशयाला …

Leave a Reply