Marathi News
मल्टीस्टारर ‘मीडियम स्पाइसी’ 2020 चा सर्वाधिक बहुप्रतीक्षित चित्रपट !

बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट ‘मीडियम स्पाइसी’ 2020 मध्ये प्रदर्शित होणार आहे. लॅन्डमार्क फिल्म्स प्रस्तुत ‘मीडियम स्पाइसी’ नागरी जीवनातल्या प्रेम, नातेसंबंध आणि लग्नसंबंधांवर प्रकाश टाकणारा सिनेमा आहे.
विधि कासलीवाल निर्मित, मोहित टाकळकर दिग्दर्शित आणि इरावती कर्णिक लिखीत ‘मीडियम स्पाइसी’ सिनेमात सई ताम्हणकर, पर्ण पेठे, ललित प्रभाकर, नेहा जोशी, पुष्कराज चिरपुटकर, सागर देशमुख, इप्शिता, नीना कुळकर्णी, रवींद्र मंकणी अशी तगडी स्टारकास्ट आहे.
मुंबई आणि पुण्यात चित्रीत झालेल्या ह्या सिनेमाविषयी चित्रपटाच्या घोषणेपासूनच उत्सुकता होती. सिनेमातल्या तगड्या स्टारकास्टमूळे तर ह्या मल्टिस्टारर सिनेमाची आता सगळे वाट पाहत आहेत. आता नव्या वर्षात झळकणारा ‘मीडियम स्पाइसी’ हा सर्वाधिक प्रतिक्षित सिनेमांमधला एक महत्वाचा सिनेमा मानला जातोय.