Bus Stop: मल्टीस्टारर ‘ बसस्टाॅप ‘ सिनेमासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता
ऑनलाईन – बिनलाईन या सिनेमाच्या यशानंतर तरुण चित्रपट निर्माता श्रेयस जाधव ‘बसस्टाॅप’ हा सिनेमा घेऊन येतो आहे. या सिनेमात आपल्याला अनेक दिग्गज कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. अमृता खानविलकर, अनिकेत विश्वासराव, हेमंत ढोमे, सिद्धार्थ चांदेकर, पूजा सावंत, रसिका सुनील, अक्षय वाघमारे, मधुरा देशपांडे, सुयोग गोरे, अविनाश नारकर, संजय मोने, शरद पोंक्षे, उदय टिकेकर, विद्याधर जोशी यांच्यादेखील प्रमुख भूमिका आपल्याला पाहायला मिळतील. गणराज असोसिएट्स आणि सारथी ग्रुप प्रस्तुत या सिनेमाचे दिग्दर्शन समीर हेमंत जोशी यांनी केलं असून पूनम शेंडे, गजेंद्र पाटील, आसू निहलानी यांचादेखील सिनेमाच्या निर्मितीत सहभाग आहे. नुकतचं सिनेमाचं शुटींग पूर्ण झालं असून सिनेमाच्या पोस्ट प्रोडक्शनला सुरुवात झाली आहॆ. या वर्षीचे राज्य पुरस्कार विजेते अभिजित अब्दे यांच्या कॅमे-यातून आपल्याला या सिनेमाची मजा घेता येईल. तरुण पिढीचे आवडते संगीतकार जसराज, हृषीकेश, सौरभ यांनी ताल धरायला लावणारं संगीत दिलंय. एकंदरीत मल्टीस्टारर असलेल्या या सिनेमाबद्दल उत्सुकता निर्माण झाली असून येत्या वर्षात ‘बसस्टाॅप’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे