Barad Marathi Movie: बरड सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

JmAMP
BARAD Marathi Movie 2016
BARAD Marathi Movie 2016

मुंबई : मराठी सिनेसृष्टीत बरेच प्रयोग होताना आपल्याला दिसत आहेत. वैविध्यपूर्ण विषयांवर सिने निर्माते सिनेमा बनवण्याचे धाडस करत आहेत. इमेज एसआरके प्रोडक्शन्स ‘बरड’ या चित्रपटाच्या निमित्ताने असाच एक ज्वलंत विषय घेऊन येत आहे.

बरड हा सिनेमा येत्या १० जूनला प्रदर्शित होत आहे. बरड म्हणजे माळरान, खडकाळ, नापिक जमीन…बागायती जमीन शेतकऱ्यांचे सर्वस्व असते तर नापिक जमीनीचा वापर केवळ गुरे चरवण्यासाठी होतो. तर अशा ह्या बरडीवर सरकारी संस्थेची थोडीशी हालचाल होते आणि एका रात्रीत फासे पलटतात. बरडीला प्रचंड महत्त्व येते. संभाव्य मिळणाऱ्या मुबलक पैशावर मोठमोटी स्वप्ने पाहिली जातात. अचानक मिळणाऱ्या पैशामुळे नाती पणाला लागतात. अचानक आलेली श्रीमंती माणसाला कशी बिघडवते, एक अफवा संपूर्ण गावाला विनाशाच्या उंबरठ्यावर कशी आणून ठेवते. यासगळ्या परिस्थितीचे उत्तम चित्रण म्हणजे ‘बरड’…

अथर्व मुवीज प्रस्तुत, देवेंद्र कापडणीस निर्मित आणि कुमार गांधी सहनिर्मित बरड या चित्रपटाचे दिग्दर्शन तानाजी महादेव घाडगे यांनी केले आहे. तर कमल चौपाल आणि सुरेंद्र सिंग ह्यांनी या सिनेमाचे छायाचित्रन केले आहे. रोहन – रोहन, संदीप वाडेकर ह्यांनी ह्या सिनेमाला संगीत दिले असून, पार्श्वसंगीत प्रकाश नर यांनी केले आहे. डॉक्टर मिथिला कापडणीस यांनी गीत लिहिले आहे. सुहास पळशीकर, भारत गणेशपुरे, शहाजी काळे, राजन पाटील, संजय कुलकर्णी, किशोर चौगुले, धनंजय जामदार असे बरेच कलाकर असलेला हा सिनेमा येत्या १० जून ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

About justmarathi

Check Also

Zoljhal

“झोलझाल” चे जय वीरू

JmAMP शोलेमधली जय-वीरूची मैत्री लवकरच मराठी पडद्यावर पहायला मिळणार आहे. अमोल कांगणे आणि ऋतुराज फडके …

Leave a Reply