स्विस रेडियोच्या प्लेलिस्टमध्ये ‘संगळंग ढंभळंग’, स्विस रेडियोवर वाजणारं पहिलं मराठी गाणं!
टियाना प्रोडक्शनचं 15 एप्रिल 2018 ला रिलीज झालेलं आदर्श शिंदेंने गायलेलं ‘सभंळगं ढंभळंग’ हे गाणं उभ्या महाराष्ट्रात गेले एक महिना गाजल्यावर आता हे गाणं जगविख्यात स्विस रेडियो स्टेशन ‘रिपब्लिक कलकुटा’लाही खूप आवडलं आहे. रिपब्लिक कलकुटाकडून हे गाणं त्यांच्या नॅशनल टेलिव्हीजन चॅनल आणि रेडियो स्टेशनच्या प्लेलिस्टमध्ये चालण्यासाठी मागवण्यात आलं आहे. असं आमंत्रणं मिळालेलं ‘सभंळगं ढंभळंग’ हे पहिलं मराठी गाणं आहे.
ह्यासंदर्भात संपर्क केल्यावर टियाना प्रॉडक्शनचे संस्थापक संचालक सुजीत जाधव म्हणाले, “हे आमच्या प्रॉडक्शनचे पहिलेच गाणे आहे. आदर्श शिंदेंने गायलेल्या ह्या गाण्याला प्रेक्षकांची दाद मिळेल असा आम्हांला विश्वास होता. पण महाराष्ट्रात ते एवढे गाजेल असे वाटले नव्हते. ह्या आनंदातच आता जगविख्यात स्विस रेडियो स्टेशनकडून आपणहूनच आमच्या गाण्याला त्यांच्या प्लेलिस्टमध्ये चालवण्यासाठी मिळालेलं आमंत्रणं म्हणजे आमच्यासाठी दुग्धशर्करा योगच म्हणायला हवा.”
ते पूढे सांगतात, “रिपब्लिक कलकुटा हे स्वित्झर्लंडमधले प्रतिष्ठित आणि लोकप्रिय रेडियो स्टेशन आहे. त्यांच्याकडून आम्हांला आमंत्रण येणं ही आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. देश-विदेशांतली निवडकच गाणी ह्या रेडियो स्टेशनवर चालतात. आणि त्यांची संगीत जाणकारांची टिम गाण्यांची निवड करते. अशावेळी संभळंग ढंभळंगला हा मान मिळणं, ही नक्कीच अभिमानाची गोष्ट म्हणायला हवी.”