Marathi News
अभिनेत्री तेजस्विनी पंडितने चाहत्यांसोबत साजरा केला वाढदिवस


अभिनेत्री तेजस्विनी पंडितचा आज(23 एप्रिलला) वाढदिवस आहे. त्यानिमीत्ताने तिच्या मुंबई, ठाणे, पूणे, नाशिकमधल्या चाहत्यांनी एकत्र येऊन तिचा वाढदिवस साजरा करायचे ठरवले. आणि मंगळवारी रात्री सर्वांनी एकत्र येऊन तेजस्विनीचा वाढदिवस ‘ब्रिंग इन’ केला.
ह्याविषयी तेजस्विनी सांगते, “दरवर्षी शूटिंग आणि कामाच्या गडबडीतच माझ्या कुटूंबासोबत किंवा मित्रमैत्रिणींसोबत वाढदिवस साजरा होतो. पण हा माझा पहिला वाढदिवस आहे, जो मी माझ्या चाहत्यांसोबत सेलिब्रिट केला आहे. त्यामूळे हा वाढदिवस आणि हे सेलिब्रेशन नक्कीच खास आहे. त्यांनी माझ्यासाठी खूप टेस्टी केक आणला होता. आणि माझ्या कारकिर्दीतल्या महत्वाच्या भूमिकांच्या फोटोंचे एक छान कोलाज असलेली फ्रेम त्यांनी मला गिफ्ट केली. एका कलाकाराला ह्यापेक्षा अधिक ते काय हवं असतं. चाहत्यांच्या ह्या प्रेमासाठीच तर आम्ही काम करतो.”



Leave a Reply
You must be logged in to post a comment.