रेशीम गाठी “बंध नायलॉनचे” लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला : Bangh Naylone Che

सध्याच्या युगात मोबाईल, इंटरनेट,सोशल मिडिया यांचा वापर वाढत चाललेला आहे त्यामुळे आजची पिढी टेक्नोसॅव्ही होत चाललेली आहे. मात्र या वाढत्या टेक्नोसॅव्हीपणामुळे नात्यांमधले रेशमी बंध हळू हळू विरळ होत चालले आहे. माणसाच्या नातेसंबंधात टेक्नॉलॉ
सोशल मिडिया, मोबाईल यांच्या मायाजाळात गुरफटलेल्या माणसाची येणाऱ्या दहा वर्षात टेक्नॉलॉजीमुळे होणारी अवस्था सिनेमात मांडली आहे. निर्माते सुनील नायर यांच्या झिरो हिट्स प्रा. लि. या बॅनरची निर्मिती असलेल्या या सिनेमात अभिनेता महेश मांजेरकर, मेधा मांजरेकर, सुनील बर्वे, सुबोध भावे, संजय नार्वेकर, श्रुती मराठे, प्रांजळ परब यांच्या प्रमुख भूमिका आहेत. कोकण, सासवड यासारख्या नयनरम्य ठिकाणी सिनेमाचे चित्रीकरणाने या सिनेमातील व्यक्तीरेखात आपलेच कुटुंब प्रेक्षकांना पाहता येईल. सिनेमाला अमितराज याचे संगीत आणि मंदार चोळकर आणि सचिन पाठक यांनी मिळून सिनेमाची गाणी लिहिली आहेत. शिरीष देसाई यांनी छायाचित्रीकरण केले असून मोहित टाकळकर यांनी सिनेमाचे संकलन केले आहे. नातेसंबंधावर आधारित असलेला हा सिनेमा २९ जानेवारीत प्रदर्शित होणार असून सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला.