Home > Marathi News > ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या पहिल्या २ पर्वांच्या यशाची सक्सेस पार्टी

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या पहिल्या २ पर्वांच्या यशाची सक्सेस पार्टी

महाराष्ट्राची हास्यजत्रा 2
महाराष्ट्राची हास्यजत्रा 2

महाराष्ट्राला रोज पोट धरून हसायला लावणाऱ्या महाराष्ट्राची हास्यजत्रा या सोनी मराठीवरील विनोदी कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला आहे. या शोचे पहिले आणि दुसरे पर्व अत्यंत यशस्वी ठरले असून १०० एपिसोड्सचा टप्पाही पार झाला आहे.

म्हणूनच हे यश साजरे करण्याकरता, ५ मे – अर्थात ‘जागतीक हास्य दिनाचे’ औचित्य साधून  सोनी मराठीकडून एक जंगी सक्सेस पार्टी आयोजित करण्यात आली होती. मराठी टीव्ही आणि चित्रपटविश्वातील तारकांच्या उपस्थितीने सजलेली ही पार्टी मुंबईमध्ये उत्साहात पार पडली. या पार्टीला प्रसाद ओक, प्राजक्ता माळी हे स्टार्स तसेच समीर चौगुलेविशाखा सुभेदारअंशुमन विचारेनम्रता संभेरावअरुण कदमपृथ्वीक कांबळेसचिन मोते व सचिन गोस्वामी इ.

कलाकार मंडळींची उपस्थिती लाभली. सोनी मराठीचे सतत नवनव्या धाटणीचे व दर्जेदार कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सक्सेस पार्टीच्यानिमित्ताने विनोदातही आपण मागे नसल्याचेच सोनी मराठीने दाखवून दिले आहे.

About justmarathi

Check Also

कोण होणार करोडपती

२७ मेपासून होणार ‘कोण होणार करोडपती?’ ची सुरूवात

२७ मेपासून होणार ‘कोण होणार करोडपती?’ ची सुरूवात – सोमवार ते गुरूवार रात्री ८.३० वाजता आपल्या ज्ञानाच्या जोरावर सारं काही शक्य आहे, हे पटवून देणारा मंच म्हणजे कोण होणार करोडपती? या मंचाचं सोनी मराठीवर नव्याने आगमन होत आहे. येत्या २७ तारखेला प्रेक्षकांच्या भेटीलायेणाऱ्या या मंचाच्यानिमित्ताने पुन्हा एकदा स्वप्नपूर्तीची वाट खुली होणार आहे. सोमवार ते गुरूवार हा कार्यक्रम प्रेक्षक पाहू शकणार आहेत. सोमवार ते बुधवार प्रेक्षकवर्ग आपल्या ज्ञानाच्या जोरावरहॉटसीट पटकवणार आहेत तर गुरूवारी काही खास  पाहुण्यांबरोबर एपिसोड पाहायला मिळणार आहे. दरम्यान नागराज मंजुळे या कार्यक्रमात सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. आपल्या ज्ञानाची तिजोरी उघडून हॉटसीटवर बसणाऱ्या सामान्यांमधला हिरो नागराज प्रेक्षकांसमोर आणणार आहेत .तेव्हा  ज्ञानाच्या जोरावर हॉटसीट गाठणाऱ्या हिरोज् ची भेट नक्की घ्या २७ मेपासून सोमवार ते गुरूवार रात्री ८.३० वाजता फक्त सोनी मराठीवर.   English: KHC show is coming soon on Sony Marathi on 27th …

Leave a Reply