Marathi News

भारतीय टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच ‘साथ दे तू मला’ च्या पडद्यामागच्या कामगारांचे फेसबुक लाईव्ह

Saath De Tu Mala
Saath De Tu Mala

 

टीव्ही मालिकांचा झगमगाट आणि चमचमत्या ताऱ्यांची दुनिया ही प्रत्येकाच्या परिचयाची,घराघरात रोज अवतरणारे हे तारे प्रेक्षकांना भुरळ घालतात ते त्यांच्या अभिनयाने आणि सुरेख दिसण्याने,त्यांचा वावर असलेले बंगले,मोठी घरे प्रेक्षकांना भारावून टाकतात,तर कधी चाळ,गावचे घर,अंगण प्रेक्षकांना आपलेसे वाटते.

प्रत्यक्ष टीव्हीच्या पडद्यावर दिसणारे हे सगळे घडवणारे अनेक हात,हे पडद्याआड असतात.नऊच्या शिफ्टला सकाळी साडेआठला हजर असलेली ही मंडळी रात्री नऊला शिफ्ट संपल्यावर सर्वात शेवटी  घरी जातात. ही माणसे कुठून उर्जा घेऊन येतात,माहित नाही पण दिवसभर थकवा नावाची गोष्ट त्यांच्या गावी नसते.तसे पाहिले तर हे क्षेत्र करीयरच्या दृष्टीने अनिश्चित पण ही माणसे झोकून देऊन काम करतात,त्यांच्या या कार्याला सलाम करण्याकरता १ मे या  कामगार दिनाचे औचित्य साधून जानवी प्रॉडक्शन्सच्या  स्टार प्रवाहवर संध्याकाळी साडेसात वाजता प्रसारित होणाऱ्या ‘साथ दे तू मला’च्या टीमने या पडद्यामागील चेहऱ्यांसोबत फेसबुक लाईव्ह केले. भारतीय टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच हा उपक्रम राबवण्यात आला.

‘साथ दे तू मला’च्या स्नेहल देशमुख,सुशील जाधव,रोहन कंटक या डिजिटल टीमने सुचवलेल्या या संकल्पनेला जतीन केशरुवाला आणि आलोक सिंग या निर्मात्यांनी पाठबळ दिल्याने ही संकल्पना प्रत्यक्षात उतरली. सविता प्रभुणे,प्रिया मराठे,आशुतोष कुलकर्णी,पियुष रानडे,प्रियांका तेंडोलकर,अंकित म्हात्रे,किरण राजपूत,रोहन गुजर या कलाकारांच्या आणि दिग्दर्शक जालिंदर कुंभार यांच्या हस्ते या सर्व टीम मेबर्सचा गौरव करण्यात आला.

आम्ही जे काम करतो,ते पडद्यावर दिसते पण आम्ही दिसत नाही,आमची नावेही नसतात,पण या फेसबुक लाईव्हमुळे आम्हाला चेहरा मिळाला,घरच्यांना आम्हाला कामाच्या ठिकाणी पाहता आले,इतक्या मोठ्या कलावंतानी आपलेपणाने आमचा सन्मान केला ही गोष्ट आयुष्यभर पुरणारी आहे‘,अशी भावना मूळच्या झारखंडच्या असलेल्या लाईटमन अनिलने बोलून दाखवली. प्रेक्षकांनी सोशल मिडीयावर या उपक्रमाबद्दल कौतुकाची थाप दिली.

https://www.facebook.com/saathdetumalaofficial/videos/902098270182117/

Related Articles

Leave a Reply

Back to top button