Marathi News

मराठी सिने क्षेत्रात सिंघल एंटरटेनमेंट ऍण्ड फिल्म्स प्रायव्हेट लिमिटेडचे दमदार पाऊल

सध्या मराठी चित्रपट बॉलिवूडशी स्पर्धा करीत आहे. मराठी सिनेमा दर्जेदार नसतात असा अनेक लोकांचा आरोप असतो. हा दोष कोणाचा? प्रेक्षकांचा की निर्मात्यांचा? हा मूळ मुद्धा नसून मराठी सिनेमांची गळचेपी हा मूळ मुद्धा आहे, असे खडे बोल सुनावले आहेत सुपर्ब प्लान या चित्रपटाचे निर्माते मनमोहन घुवालेवाला यांनी. त्यांचे म्हणणे आहे की मराठी सिनेमाला सर्वच गृहित धरतात. पण आपण हे विसरुन चालणार नाही की श्वास या चित्रपटापासून मराठी सिनेमा ऑस्करची वारी करीत आहे. मराठी चित्रपट परदेशातही जागत आहेत. मराठी कलाकारांना बॉलिवूड आणि इतर प्रादेशिक चित्रपटात प्रचंड मागणी आहे. सयाजी शिंदे सारखे मराठी कलाकार दाक्षिणात्य चित्रपटांत आपली छाप पाडत आहेत. मग तरीही मराठी सिनेमा दर्जेदार नसतात असा आरोप का होतो असा प्रश्न मनमोहन घुवालेवाला यांनी विचारला आहे.

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे लाडके सांस्कृतिक मंत्री श्री. विनोद तावडे यांनी म्हटलं होतं की मल्टिप्लेक्समध्ये मराठी सिनेमांना शो मिळणे कठीण होऊन बसते. म्हणूनच तावडे यांनी सांगितले होते की मराठी सिनेमा दाखवण्यास सक्ती करावी. यावर बराच वाद निर्माण झाला होता. पण मराठी सिनेमाची उपेक्षा होता कामा नये एवढीच मराठी माणसाची इच्छा आहे. असे मतंही सुपर्ब प्लान सिनेमाचे निमार्ते मनमोहन घुवालेवाला यांनी व्यक्त केले आहे.

मराठी सिने क्षेत्रात सिंघल एंटरटेनमेंट ऍण्ड फिल्म्स प्रायव्हेट लिमिटेडने दमदार पाऊल टाकले आहे. या कंपनीचे सर्वेसर्वा मनमोहन घुवालेवाला असून ते लवकरच एक मर्डर मिस्ट्री घेऊन येत आहेत आणि या सिनेमाचे नाव आहे सुपर्ब प्लान. सुपर्ब प्लान या सिनेमाचे चित्रिकरण कॅनेडा आणि भारतात झाले आहे. कॅनडात रहणारे एक नागरिक व भूतपूर्व पोलिस ऑफिसर सत्यानंद गायतोंडे यांनी या चित्रपटात प्रमुख भुमिका निभावली आहे. या सिनेमाचे विशेष आकर्षण म्हणजे अभिनेत्री तृप्ती भोईर… तृप्तीचा टुर्रिंग टॉकिज हा सिनेमा नुकताच ऑस्करची वारी करुन आला. सुपर्ब प्लान एक मर्डर मिस्ट्री आहे आणि हि मर्डर मिस्ट्री सोडवणार आहेत, मराठीतले दबंग कलाकार राजेंद्र शिसतकर. राजेंद्र शिसतकर यांनी क्राइम पेट्रोलमध्ये इन्स्पेक्टरच्या भुमिकेतून अनेक केसेस सोडवले आहेत. आता ते सुपर्ब प्लानमध्ये एक सुपर्ब केस सोडवणार आहेत.

गिरीश परदेशी, नयना मुके, सुकन्या सुर्वे, शरद गुरव, अतुल तोंडणकर, विद्या सावले, डॉ. सुधीर निकम, अनिल डोंगरे, राजू मोरे हे कलाकार आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन जय तारी यांनी केले आहे. तर नृत्य दिग्दर्शन ऊर्वी सेठ धृव यांनी केले आहे. या सिनेमाची जमेची बाजू म्हणजे चित्रपटातील गाणी. या सिनेमात बॉलिवूडकरांनाही तोंडात बोटे घालायला लावेल अशा प्रकारचे संगीत आपल्याला ऐकायला मिळणार आहे. काशी रिचर्ड, राजेंद्र वैशंपायन, बी. विनायक आणि मधू कृष्ण यांनी चित्रपटाला संगीत दिले आहे. तर चित्रपटातील गाणी किशोर टोकवाल, बी. विनायक, चंद्रकांत निर्भवने आणि जयेश शत्रुघ्न मेस्त्री यांनी लिहिली आहेत. या चित्रपटाचा संगीत करार संगीत क्षेत्रातील सुप्रसिद्ध कंपनी झी म्यूजिक यांच्यासोबत झाला आहे. “झी”चे प्रभारी निखिल साने यांच्या प्रयत्नाने अनेक उत्तमोत्तम चित्रपट मराठी रसिकांना पहायला मिळाले आहेत. आता सुपर्ब प्लान या सिनेमाची गाणी प्रेक्षकांना भुरळ पाडणार आहेत.

आजकाल सिनेमाची रुपरेषा बदलत चालली आहे. सिनेमा बनवण्यात जेवढा पैसा खर्च होतो. त्याहीपेक्षा अधिक पैसा सिनेमा प्रदर्शित करण्यासाठी होतो. म्हणून चांगले निर्माते या क्षेत्रापासून दोन पावलं लांब असतात. पण तरीही मनमोहन घुवालेवाला यांनी या क्षेत्रात उतरण्याचे धाडस दाखवले आहे व त्यांना मराठी सिनेमाचा कायापालट करायचा आहे. त्याची सुरुवात सुपर्ब प्लान या चित्रपटाने होत आहे. महाराष्ट्रातील सिनेमागृहात लवकरच हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. हा सिनेमा मराठी सिनेसृष्टीत इतिहास निर्माण करेल असा विश्वास सिनेमाचे निर्माते मनमोहन घुवालेवाला यांनी व्यक्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button