Marathi News

भोली सूरत आता नव्या रूपात…

bholi surat

तरूणाईलाही या सदाबहार गीताची भुरळ
तना-मनात बहर फुलवणारे, सदाबहार गाणे जे गेली कित्येक वर्ष प्रेक्षकांच्या ह्रदयात ठाव मांडून आहे….हे गाणे एक अलबेला या चित्रपटाच्यानिमित्ताने एका नव्या स्वरूपात सोशल मिडीयावर आले…आणि तरूणांना भुरळ घातली…60-62 वर्षांपूर्वी अलबेला या चित्रपटातून आपल्या भेटीला आलेले हे गाणे आजही तितकेच ताजे आहे. सोशल मिडीयावर नुकतेच हे गाणे लाँच करण्यात आले आणि तरूणांना या गाण्याच्या तालावर ठेका धरायला लावण्यात पुन्हा यशस्वी झाले. 1951 मध्ये ‘अलबेला’ सिनेमा आला आणि प्रेक्षकांना खूप भावला. स्टंट आणि ऍक्शन फिल्मस् बनवणाऱ्या भगवान दादांच्या आयुष्यातला पहिला सोशल सिनेमा…ऍक्शन आणि स्टंट सिनेमांचा संगीताशी कोणताही संबंध नसताना आपल्या पहिल्याच सोशल सिनेमात भगवान दादांनी दिलेली गाणी प्रेक्षकांच्या मनात आजही घर करून आहेत. फार कमी गाणी असतात जी वर्षानुवर्ष रसिकांना लुभावतात. याच पठडीत मोडणारे गाणे जे गेली कित्येक वर्ष रसिकांना नाचायला भाग पाडतं…ते गाणं म्हणजे….भोली सूरत दिल के खोटे, नाम बडे और दर्शन छोटे…हे गाणे जेवढे प्रसिध्द आहे, तेवढ्याच त्याच्या स्टेप्सही… ज्या प्रेक्षक आजही पार्टीज् मध्ये करताना दिसतात. फक्त प्रेक्षकच नाही तर सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज ही या स्टेप्सने प्रेरित आहेत. अमिताभ बच्चन, मिथुन चक्रवर्ती, ऋषी कपूर, गोविंदा… त्यांच्या अनोख्या डान्सिंग स्टाईल साठी प्रसिध्द असणारे हे नट भगवान दादांच्या नृत्यशैलीच्या आधारावर भाव खाऊन गेले. असे कित्येक सिनेमे आहेत जे केवळ या अभिनेत्यांच्या डान्सिंग स्टेप्स साठी प्रसिध्द आहेत. मात्र याचे सगळे श्रेय जाते भगवाना दादांना ज्यांनी साध्या, सरळ, सोप्या नृत्याची भेट हिंदी सिनेसृष्टीला दिली.

भगवान दादांनी बनवलेल्या ‘अलबेला’ या सिनेमात तब्बल 11 गाणी होती. संगीतकार सी. रामचंद्र यांच्या संगीताने सजलेली ही गाणी प्रेक्षकांना खूप भावली. त्यापैकीच एक भोली सूरत ज्यात खुद्द भगवान दादा आणि लावण्याची खाण गीता बाली एकमेकांकडे पाहून नाकं मुरडताना दिसतात…हाच काळ पुन्हा आपल्या डोळ्यासमोर येणार आहे. येत्या 24 जूनला… भगवान दादांच्या जीवनावर आधारीत ‘एक अलबेला’ हा चित्रपट येत्या 24 जूनला आपल्या भेटीला येत आहे. ज्या चित्रपटात हे गाणे पुन्हा एकदा चित्रित करण्यात आले आहे. हे गाणे पुन:चित्रित झाले आहे या चित्रपटात भगवान दादांची भूमिका साकारणाऱ्या मंगेश देसाई आणि गीता बालीच्या भूमिकेत असणाऱ्या विद्या बालन यांच्यावर…

या गाण्याची लोकप्रियता एवढी आहे की 1951 साली आलेले हे गाणे आजही गणपतीच्या मिरवणूकीत आवर्जून आपल्या कानी पडते. एवढ्या वर्षांनंतरही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात हे गाणे हमखास ऐकवले जाते. येत्या 24 जूनला या गाण्याची जादू आपण पुन्हा एकदा पडद्यावर अनुभवणार आहोत…तेव्हा या गाण्यावर थिरकण्यासाठी तयार आहात ना?

Related Articles

Leave a Reply

Back to top button