Marathi News

बंगाली इंद्रनीलची मधाळ मराठी

Indraneil Sengupta

‘कहानी’ सारखा दर्जेदार हिंदी चित्रपट , ‘मिशोर रोहोश्यो’ सारखा परितोषिक प्राप्त बंगाली सिनेमा, प्यार के दो नाम… एक राधा एक श्याम या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता इंद्रनील सेनगुप्ता लवकरच आपल्याला मराठी सिनेमातून पहिल्यांदा दिसणार आहे. इरॉस इंटरनॅशनल आणि रवि जाधव निर्मित ‘& जरा हटके’ सिनेमात इंद्रनील अभिनय करताना दिसेल. सिनेमात देखील त्यांने बंगाली व्यक्तिरेखा साकारली आहे. हा सिनेमा मराठी आणि बंगाली जोडप्याची हटके लव्हस्टोरी ठरेल. या सिनेमात अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आणि इंद्रनीलची नवी कोरी जोडी असेल. इंद्रनील मुळचा बंगाली आणि त्याने हिंदी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यामुळे ‘& जरा हटके’ सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदा त्याचा संपर्क मराठी भाषेशी आणि चित्रपटांशी आला होता. याबद्दल इंद्रनील म्हणाला, माझी पहिली मराठी फिल्म एक वेगळा प्रयत्न मी करतोय. मराठी भाषेतील संवाद समजून घेऊन ते मांडण्यासाठी सिनेमाच्या टीममधून सगळ्यांनी माझी मदत केली.

दिग्दर्शक प्रकाश कुंटे यांनी खूप संयम आणि धीर बाळगून माझ्याकडून सिनेमातील भूमिका करवून घेतली. त्यामुळेच मी मराठी सिनेमा करू शकलो. ‘& जरा हटके’ सिनेमा आजच्या मॉडर्न जगातील नात्यामध्ये बदलत चाललेली भावनिकता आणि त्यातून दोन जनरेशनमध्ये घातलेली सांगड मांडणारा आहे. ‘&’ हे अक्षर मुळात दोन भिन्न गोष्टी जोडणारे असून नात्यांना कम्प्लीटनेस मिळवून देणारे आहे. तोच कम्प्लीटनेस हा सिनेमा पाहताना प्रेक्षक नक्कीच अनुभवतील. या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना नव्या युगातील वेगाने बदलत असलेल्या नात्यांतील गुंतागुंत जरा हटके पद्धतीने सादर करण्याचाआम्ही प्रयत्न केला आहे. २०१६ वर्षातील एप्रिल महिन्यात प्रदर्शित होणारा हा माझ्यासाठी खूप प्रेरणादायी ठरेल.

Related Articles

Leave a Reply

Back to top button