तू ही रे मध्ये दिसणार सईच्या लूकचा प्रिझम
ग्लॅमरस, हॉट, बोल्ड अंदाज असणाऱ्या सईच्या रुपाची जादू फिल्म इंडस्ट्रीत तर आहेच पण लाखो मुली तिला फॉलो करताना दिसतात. मराठी फिल्म इंडस्ट्रीमधील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तिचं नाव आग्रहाने घेतलं जातं. ब्रेन वीथ ब्युटी असं परफेक्ट कॉम्बिनेशन सईमध्ये पाहायला मिळतं. तिने आत्तापर्यंत केलेल्या सगळ्याच भूमिका वेगवेगळ्या शेड्सच्या आणि जॉनरच्या होत्या. ‘तू ही रे’ च्या निमित्ताने देखील आपल्याला एक वेगळीच सई पाहायला मिळणर आहे. छोट्या गावात राहणारी कम्प्लीट देसी गर्ल. तोंडी गावरान भाषा, सोज्वळ स्वभावाची नंदिनी जिला आपला भावी नवरा आपला प्रियकर असावा अशी इच्छा असते. तिच्यावरती चित्रित झालेलं सुंदरा हे गाणं तिच्या रूपाचं आणि गुणांच हुबेहूब वर्णन करणारं आहे. त्याचबरोबर नंदिनी आपल्याला मॉंडर्न, सेशुअस अशा हटके रुपात तू ही रे सिनेमाच्या निमित्ताने पाहायला मिळणार आहे. येत्या ४ सप्टेबर संपूर्ण महाराष्ट्रात हा सिनेमा प्रदर्शित होत आहे.