तुफान अॅक्शन सिक्वेन्स असलेला ‘वृंदावन’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Vrindavan

 धमाकेदार अॅक्शन सिक्वेन्स, कॉमेडी, रोमँटिक आणि फॅमिली ड्रामा असलेला वृंदावन हा सिनेमा भारीच चर्चेत आहे. सर्वात महागड्या समजल्या जाणाऱ्या आयुष रिसोर्टमध्ये या सिनेमाच चित्रिकरण करण्यात आलं आहे. आतापर्यंत हिंदी चित्रपटांसाठी नामांकित असलेल्या या रिसोर्टमध्ये वृंदावन या मराठी चित्रपटाने प्रथमच हजेरी लावली आहे.  कंम्पलीट एंटरटेनमेंटच पॅकेज असलेल्या या सिनेमातून राकेश बापट हा चॉकलेट बॉय दमदार पदार्पणास सज्ज झाला आहे. मराठी सिनेमांमध्ये आतापर्यंत कधीही न पाहिलेला असा अॅक्शन सिक्वेन्स या सिनेमात पाहायला मिळणार आहे. राकेश बापट याच्यासोबतच आपल्याला पूजा सावंत आणि वैदेही परशुरामी या दोघीही प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. या सिनेमाची आणखी एक खासियत म्हणजे अशोक सराफ , महेश मांजरेकर, मोहन जोशी, शरद पोंक्षे, उदय टिकेकर, भारत गणेशपुरे या दिग्गज अभिनेत्यांच्या अभिनयाची जुगलबंदी आपल्याला या चित्रपटातून अनुभवता येणार आहे.

टी एल व्ही प्रसाद या सुप्रसिद्ध दक्षिणात्य दिग्दर्शकाने या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे, त्यामुळे हा सिनेमा प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करेल यात शंका नाही. हिंदी तसेच साउथ सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवणारे राजप्रेमी, संदीप शर्मा, सुनील खांद्पुरकर हे तिघे निर्माते असून अमित कारखानीस आणि अनघा कारखानीस हे या सिनेमाचे सहनिर्माते आहेत. ‘रिअलस्टिक फिल्म कंपनी’ या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे.  हिंदी सृष्टीतल्या अनेक दिग्गज कलाकारांना आपल्या तालावर नाचवणारे  गणेश आचार्य हे सिनेमाचे कोरिओग्राफर असून अमितराज यांनी सुमधुर अस संगीत दिल आहे. अगदी नादखुळा करून सोडणा-या ‘आला रे आला डेशिंग गोविंदा’ गाण्याचे शब्द सचिन पाठक (यो) यांनी लिहिले असून अवधूत गुप्ते यांनी ते गायले आहे, तर ‘आज प्रेमाची’ हे गाण हर्षवर्धन वावरे आणि आनंदी जोशी या दोघांनी मिळून गायल आहे. धमाकेदार अॅक्शन सिक्वेन्स, कानाला सुमधुर वाटणारी गाणी, दिग्गजांचा अभिनय असलेला हा सिनेमा आपली गुढी उभारण्यासाठी सज्ज झाला आहे. जीसिम्सचे कार्तिक निशानदार आणि अर्जुन बर्हान हे सिनेमाचे प्रमोटर्स आहेत. येत्या ८ एप्रिलला म्हणजेच गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर हा सिनेमा महाराष्ट्रासह सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

About justmarathi

Check Also

Samatar Marathi Web Series

“समांतर” पहिलीवहिली बहुभाषिक मराठी वेबसिरीज

Samatar Marathi Web Series: एकाचा भूतकाळ दुसऱ्याच भविष्य असेल तर काय घडू शकत? या आशयाला …

Leave a Reply