Marathi News

छोट्या मृणालची मोठी घोडदौड

IMG_4057
गेल्या काही वर्षात सिनेमा, मालिका आणि जाहिरातींमध्ये लहान मुलांचा वावर वाढला आहे. प्रेक्षकांना भावणारी त्यांची निरागसता, प्रेमळ स्वभाव सिनेमा, मालिका आणि जाहिरातील एक महत्वाचा एलिमेंट म्हणून त्याकडे पाहीलं जात. आपल्या मराठी सिनेमातील काही दिग्गज मंडळींची कारकीर्द बालकलाकार म्हणून सुरु झाली. ज्येष्ठ अभिनेता सचिन पिळगावकर, महेश कोठारे तर महाराष्ट्राचा लाडका छकुला आदिनाथ कोठारे याची आठवण झाल्या शिवाय रहात नाही. या बालकलाकारांच्या यादीत आणखी एक नाव दाखल झालं आहे. ते म्हणजे मृणाल जाधव हिचं. पदार्पणातच एका पेक्षा एक हिट सिनेमातून तिने काम करून आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे. लवकरंच ती ४ सप्टेबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या संजय जाधव दिग्दर्शित ‘तू ही रे’ या सिनेमात दिसणार आहे. स्वप्नील जोशी, सई ताम्हणकर आणि तेजस्विनी पंडित यांच्यासोबत महत्वाची भूमिका सकाराली आहे. तिची ‘लय भारी’ सिनेमामधील छोटी रुक्मिणी प्रेक्षकांना खूप भावली. गोड, निरागस आणि चुणचुणीत अशा मृणालने आत्तापर्यंत ‘राधा ही बावरी’, ‘कोर्ट’, ‘नागरिक’, ‘टाइमपास २’, ‘दुश्यम’ असे ब्लॉकबस्टर सिनेमे दिले आहेत. त्यामुळे मृणाल तिच्या लाडक्या छोट्या चाहत्यांना ‘तू ही रे’ च्या निमित्ताने कोणत्या रुपात पाहायला मिळते याबाबत नक्कीच उत्सुकता आहे.

IMG_4087

Related Articles

Leave a Reply

Back to top button