Marathi News

किशोरावस्थेवर भाष्य करणार ‘बॉईज’ सिनेमा

Boys standee

बॉईज’…! या नावातच बरेच काही असणारा हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांसमोर येत आहे. या सिनेमात किशोरवयीन मुलाचे अनेक पैलू मांडण्यात आले आहे. त्याच किशोरवयीन मुलांच्या गमतीजमती, त्यांचा प्रत्येक गोष्टींमध्ये बघण्याचा आयाम, या सर्व गोष्टींवर हलकेफुलके भाष्य आपल्याला या सिनेमातपाहायला मिळणार आहे. ‘आजोबा’ तसेच ‘कॉफी आणि बरंच काही’ या चित्रपटांच्या यशस्वी निर्मितीनंतर सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या बॅनरखाली; लालासाहेब शिंदे आणि राजेंद्र शिंदे हे निर्माते पुन्हा ‘बॉईज’ हा सिनेमा आपल्यासमोर घेऊन येत आहे. या चित्रपटाचा मुंबईत लोअर परेल येथे,नुकताच मोठ्या दिमाखात टिजर पोस्टर लाँच करण्यात आला.

तीन मित्रांचा पाठमोरा लुक असणारा हा टिजर पोस्टर पाहताना हा सिनेमा कम्प्लीट युथ इंटरटेनिंग सिनेमा असल्याचे लक्षात येते. तुर्तास या टिजर पोस्टरमधली तीन मुले कोण आहेत हे गुपितच ठेवण्यात आली असून, खुद्द सनी लिओनी या सिनेमातील एका गाण्यात थिरकली आहे; सुनिदी चौहानच्या आवाजातील हे गाणे सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य यांनी कॉरीओग्राफ केले असल्यामुळे  प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली आहे.

या चित्रपटाची आणखीन एक खासियत म्हणजे, आतापर्यत एकविरा प्रॉडक्शनअंतर्गत सिने-दिग्दर्शक संगीत-दिग्दर्शक आणि निर्मात्याच्या भूमिकेत दिसणारे अवधूत गुप्ते आपल्याला ”बॉईज’ या सिनेमाद्वारे प्रथमच प्रस्तुतकर्ते म्हणून पाहायला मिळणार आहेत. तसेच अनेक यशस्वी चित्रपटातून सहदिग्दर्शकाची जबाबदारी पेलणारे विशाल देवरुखकर प्रथमच दिग्दर्शक म्हणून मराठी चित्रपटात ‘बॉईज’ द्वारे आपले पदार्पण करत आहेत.

या चित्रपटात संतोष जुवेकर, झाकीर हुसेन, शिल्पा तुळसकर, शर्वरी जमिनेस आणि वैभव मांगले या कलाकारांची भूमिका आहे. घरापासून दूर हॉस्टेलमध्ये राहत असलेल्या युवा पिढीची दुनिया यात प्रेक्षकांना पाहायला मिळणार असून, सिनेमाच्या टिजर पोस्टरवरील ही तिकडी लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. किशोरवयीन मुलांची धुडगूस, मौजमज्जा आणि प्रेम दाखवणारा हा सिनेमा युथ फेस्टिवल महिना म्हणून प्रचलित असलेल्या ऑगस्टमध्ये महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत आहे,

Related Articles

Leave a Reply

Back to top button