Marathi News
अभिनेत्री पूजा सावंत प्रेग्नंट!

अभिनेत्री पूजा सावंतकडे सध्या अनेक दिग्दर्शकांची रांग लागली आहे. त्यामुळे तिच्या हातात अनेक चित्रपट देखील आहेत. तिच्या सौंदर्य आणि अभिनयावर मराठी तरुणाई घायाळ झाली असताना पूजा सावंत चक्क ‘प्रेग्नंट’ असल्याची बातमी समोर आली आहे. सोशल नेट्वर्किंग साईटवर तिचा एक फोटो लिक झाला असून, त्यात ती गरोदर असल्याचे समजून येत आहे. तसेच सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार येत्या १४ जुलैची ड्यू डेट तिला देण्यात आली आहे. या बातमीमुळे पूजाच्या चाहत्यांना अर्थातच शॉक बसला असेल, योगायोग म्हणजे तिचा आगामी सिनेमा ‘लपाछपी’ हा देखील १४ जुलैला प्रदर्शित होत आहे. त्यामुळे मराठीतील ही ‘कलरफुल’ अभिनेत्री सध्या जास्तच बीजी असल्याचे समजते आहे.
Leave a Reply
You must be logged in to post a comment.