Marathi News

इरॉस इंटरनॅशनल आणि रवि जाधवचा ‘&’ देणार प्रेक्षकांना देणार एक इमोशनल कहानी : & Marathi movie

आजपर्यंत चित्रपट रसिकांनी  निर्माण झालेल्या गोल्डन एरातीलसिनेमांना आणि कंटेम्पपरी सिनेमांना भरभरून प्रतिसाद दिला आहे. तोच विश्वास सार्थ ठरवत मराठी चित्रपटांचा यशस्वी आलेख उंचावणारा आहे. इरॉस इंटरनॅशनलचा ‘& बरंच काही’ हा अजून एक सिनेमा येत्या वर्षाची छान भेट घेऊन येत आहेत.

इरॉस इंटरनॅशनल आणि रवि जाधव यांची सहनिर्मिती असलेला हा सिनेमाप्रेक्षकांना एक वेगळाच अनुभव देणारा असेल. इरॉस इंटरनॅशनलच्या निर्माती कृशिका लुल्ला यांचा फुंतरु नंतर हा दुसरा सिनेमा  आहे.

रवी जाधव हे मराठी सिनेसृष्टीतले प्रसिद्ध दिग्दर्शक असून सध्या हिंदी सिनेसृष्टीतही  कार्यरत आहेत,  त्यांच्या ‘& बरंच काही’ चित्रपटाची कथा ऐकल्यानंतर हा चित्रपट करावा अस वाटलं.  रवी जाधव यांच्यासोबत मिळून काम करण्याचा आम्हाला खूप आनंद झाला आहे. मराठीत हा सिनेमा बनवल्यानंतर कन्नड भाषेतही हा सिनेमा करण्याचा विचार इरॉस करीत आहेत. रवी जाधव यांच्यासोबत ‘& बरंच काही’ सिनेमाच्या निमित्ताने सुरू झालेला प्रवास हा असाच पुढेही चालू चालू राहणार आहे कारण आम्ही मिळून अनेक प्रोजेक्ट करीत आहोत.  हा सिनेमा प्रेक्षकांना नक्कीच आवडेल, असे मत इरॉसच्या क्रीशिका लुल्ला यांनी यावेळी व्यक्त केले. तर इरॉस इंटरनॅशनलचे आभार मानत रवी जाधव म्हणाले, “& बरंच काही’ चित्रपटाची कथा क्रीशिका यांना ऐकल्यावरनंतर त्यांनी हा सिनेमा करूया अस मला सांगितले.  ‘& बरंच काही’ या सिनेमाची कथा वेगळी पण कॉमन आहे. दोन पिढ्यांमधले नातेसंबंध या सिनेमात पाहायला मिळणार आहे. माय – लेक, वडील – मुलगा यांच्यात असणाऱ्या गुंतागुंतीच्या नात्यांचा वेध या चित्रपटात घेण्यात आला आहे. माझ्यावर आणि माझ्या कामावर विश्वास ठेऊन आमच्या सोबत भागीदारी केलेल्या इरॉस इंटरनॅशनलचा मी  आभारी आहे. “

इरॉस इंटरनॅशनल आणि रवि जाधव यांची सहनिर्मिती असलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन प्रकाश कुंटे यांचे आहे. नुकताच या सिनेमाचा मुहूर्त गोरेगाव आरे कॉलेनीयेथील लक्ष्मी स्टुडियोत पार पडला. त्यावेळी सिनेमाची संपूर्ण टीमउपस्थित होती. अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, इंद्रनील सेनगुप्ता, सिद्धार्थ मेनन आणि शिवानी रंगोळे अशी तगडी स्टारकास्ट सिनेमात एकत्र दिसणार आहे.विशेष म्हणजे इंद्रनील सेनगुप्ता या सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदा मराठी चित्रपटात काम करणार आहे.  भावनांच्या गर्तेत सापडलेल्या आणि त्यातून मनाने निर्णय घ्यावा किंवा बुद्धीने अशा द्वीधा मन:स्थितीत सापडलेल्या कुटुंबाची कथा आहे.हे. 

Related Articles

Leave a Reply

Back to top button