Home > Marathi News > अमेय झळकणार हिंदी वेब सिरीज मध्ये

अमेय झळकणार हिंदी वेब सिरीज मध्ये

Arshad Amey

मराठीचा युवा स्टार अभिनेता अमेय वाघ आपल्या चाहत्यांना एका मागून एक आश्चर्याचे धक्के देत आहे. काही दिवसांपूर्वी अमेयने सोशल नेटवर्किंग साईटद्वारे, लवकरच निगेटिव्ह भूमिकेतून झळकणार असल्याची माहिती दिली होती. या बातमीची चर्चा होत असतानाच, त्याने आणखीन एका नव्या प्रोजेक्टबद्दल सांगत त्याच्या चाहत्यांना खुश करून टाकलं आहे. ती बातमी म्हणजे, अमेय लवकरच एका सुप्रसिद्ध हिंदी वेबसिरीजमधून प्रेक्षकांसमोर येत आहे. डिंग इंटरटेंटमेंट निर्मित आणि अनिरुद्ध सेन दिग्दर्शित ‘असुरा’ असे त्याचे नाव असून, वूट ऍपवर प्रदर्शित होणारी हि एक थ्रिलर गोष्ट आहे. विशेष म्हणजे, अमेयची यात महत्वपूर्ण भूमिका असून, तो पहिल्यांदाच अश्या थ्रिलर वेबसिरीजमध्ये काम करताना दिसून येणार आहे.
हिंदीच्या नावाजलेल्या कलाकारांचा समावेश असलेल्या या वेबसिरीजमध्ये बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसीची प्रमुख भूमिका आहे. ‘असुरा’ या वेबसिरीजच्या निमित्ताने अर्शदसोबत काम करण्याची संधी अमेयला मिळणार असल्याकारणामुळे, तो देखील खूप उत्सुक आहे.  इतकेच नव्हे तर, नवीन वर्षाच्या सुरुवातीला प्रेक्षकांच्या भेटीस येत असलेल्या या वेबसिरीजनंतर, अमेयकडे त्याच्या चाहत्यांसाठी आणखीन एक मोठे सरप्राईज आहे ! मात्र ते काय आहे, हे जाणून घेण्यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

About justmarathi

Check Also

Sayli Sanjiv, Om prakash Shinde

राजश्रीच्या ‘यु टर्न’ मध्ये हटके खटके

असं म्हणतात,की लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात. इथे फक्त त्या निभावाव्या लागतात. हे नातं …

Leave a Reply