Marathi News

एंटरटेनमेंटचा भरपूर मसाला असलेला ‘वृंदावन’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला : Vrundavan

Vrundavan Marathi Movie Poster
Vrundavan Marathi Movie Poster

भरपूर एंटरटेनमेंट असलेला ‘वृंदावन'(Vrundavan Marathi Movie) हा सिनेमा सध्या खूप चर्चेत आहे. एंटरटेनमेंटचा भरपूर मसाला, ड्रामा आणि अॅक्शनने परिपूर्ण असा हा सिनेमा असून, तगडी स्टारकास्ट असलेला सिनेमा अशी प्रदर्शनापूर्वीच ‘वृंदावन’ या सिनेमाने ओळख बनवली आहे. या सिनेमाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे. या पोस्टरच्या केलिग्राफीवर मोरपीस दाखवल्यामुळे हा पोस्टर पाहताच क्षणी  लोकांना भूलवतो. शिवाय ‘वृंदावन’च्या सगळ्यात मह्गड्या अशा आयुष रिसोर्टचे भव्य लोकेशन देखील या पोस्टरवर दिसून येईल. अशाप्रकारे, दिग्गज कलावंतांच्या मांदियाळीत उभे राहिलेले ‘वृंदावन’ चे हे पोस्टर असून, ते या सिनेमाचे प्रातिनिधिक स्वरूप दाखवते.

या सिनेमातील जमेची बाजू म्हणजे, मराठी सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी यात पाहायला मिळणार आहे. धमाकेदार अॅक्शन सिक्वेन्स, कानाला सुमधुर वाटणारी गाणी आणि दिग्गजांचा अनुभव या सिनेमात प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. शिवाय, राकेश बापट हा हिंदी मालिकांमध्ये दिसणारा चॉकलेट हिरो या सिनेमात धमाकेदार अॅक्शन सिक्वेन्स करताना दिसेल. राकेशसोबतच पूजा सावंत तसचं वैदेही परसूरामी ही मुख्य भूमिकेत असणार आहेत. या सिनेमाची आणखी एक खासियत म्हणजे महेश मांजरेकर, अशोक सराफ, मोहन जोशी, शरद पोंक्षे, उदय टिकेकर , भारत गणेशपुरे, या दिग्गज अभिनेत्यांच्या अभिनयाने नटलेला असा हा सिनेमा असणार आहे. आतापर्यंत रिजनल भाषेत काम करणारे टीलव्ही प्रसाद यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे,  त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांचे भव्य मनोरंजन करेल यात शंका नाही. राजप्रेमी, संदीप शर्मा, सुनील खांद्पूर या तिघांनी मिळून ‘रिअलस्टिक फिल्म कंपनी’च्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती केली तर अमित कारखानीस आणि अनघा कारखानीस हे सहनिर्माते आहेत.जीसिम्सचे कार्तिक निशानदार आणि अर्जुन बर्हान हे सिनेमाचे प्रमोटर्स आहेत. हिंदी सृष्टीतल्या अनेक दिग्गज कलाकारांना आपल्या तालावर नाचवणारे गणेश आचार्य यांनी सिनेमातल्या कलाकारांना आपल्या इशाऱ्यांवर नाचवलं असून अमितराज यांनी सिनेमाला संगीत दिलं आहे. एकंदरीतच एंटरटेनमेंटचा मालमसाला असलेला हा चित्रपट नवीन वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button