महागायिका वैशाली म्हाडे झाली बिग बॉसच्या घराची पहिली महिला कॅप्टन
बिग बॉसच्या घरात चौथ्या आठवड्यात महागायिका वैशाली म्हाडे कॅप्टन झाली आहे. बिग बॉसने दिलेल्या ‘सही रे सही’ ह्या टास्कमध्ये जिंकून वैशाली कॅप्टन झाली आहे. वैशालीने फळ्यावर सर्वाधिक ऑटोग्राफ म्हणजेच 276 स्वाक्ष-या करून कार्य जिंकले.
झीमराठीवरच्या ‘सारेगमप’ ह्या रिएलिटी शोव्दारे सिनेसृष्टीला ही महागायिका मिळाली. त्यानंतरही वैशाली दरवर्षी एक रिएलिटी शोव्दारे आणि मराठी-हिंदी टिव्ही आणि सिनेसृष्टीत गायलेल्या आपल्या एकाहून एक सुमधूर गाण्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले.
हिंदी-मराठी टेलिव्हीजनवर 10 रिएलिटी शो केल्यावर वैशालीचा बिग बॉस हा अकरावा रिएलिटी शो आहे. वैशाली बिग बॉसच्या घरात जाताना म्हणाली होती, “मी जशी आहे, तशीच बिग बॉसच्या घरात राहून घरातल्यांची आणि माझ्या चाहत्यांची मनं जिंकण्याचा मी प्रयत्न करेन.”
वैशालीने पहिल्या दिवसापासूनच कोणताही मुखवटा न घालता खरेपणाने ह्या रिएलिटी शोमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले. म्हणूनच जेव्हा वैशाली कॅप्टन झाली तेव्हा शिवने आणि संपूर्ण घरच्यांनी तिचे कॅप्टन रूममध्ये थाटात स्वागत केले.