Marathi News

पार्थ समथान आणि हिना खान बनलें 2019 चे टॉप टेलीव्हिजन स्टार्स

Top 5 Television Actors And Actresses of 2019
Top 5 Television Actors And Actresses of 2019

हे वर्ष छोट्या पडद्यावरच्या हिंदी कलाकारांसाठी आठवणीतले होते. अनेक रिएलिटी शोज, डेली सोप्स आणि कॉमेडी सीरियल्सच्या लोकप्रियतेनूसार, अभिनेते आणि अभिनेत्रींच्या लोकप्रियतेतही चढ-उतार पाहायला मिळाले. 2019 मध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, व्हायरल न्यूज आणि न्यूज़प्रिंटवर लोकप्रियतेत असेलल्या 10 हिंदी टेलीव्हिजन कलाकांची यादी स्कोर ट्रेंड्स इंडियाने काढली आहे.

ह्या रेटिंगच्यानूसार, टेलीव्हिज़न मालिका ‘कसौटी ज़िन्दगी की 2’ चा अभिनेता पार्थ समथान आणि अभिनेत्री हिना खानने 2019 च्या स्कोर ट्रेंड्सच्या वर्षाखेरीच्या यादीत 100 गुणांसह पहिला क्रमांक पटाकवला आहे.

ह्याच मालिकेत ‘पार्थ’, ‘अनुराग बासु’च्या भूमिकेत आणि हिना ‘कमौलिका’च्या भूमिकेत दिसली होती. ह्या दोघांच्या लोकप्रियतेनूसार, ट्विटर, इंस्टाग्राम आणि फेसबुकवर सर्वच्या सर्व गुण मिळवून हे दोघेही पूर्ण वर्षाच्या लोकप्रियतेच्या यादीत प्रथम क्रमांकावर आहेत. न्यूज़प्रिंट और व्हायरल न्यूजमध्येही बाकी टेलिव्हिजन सेलिब्रिटीजना ह्या दोघांनी मागे टाकले आहे.

टेलिव्हिज़न स्टार दिव्यांका त्रिपाठीची मालिका ‘ये है मोहब्बतें’मूळे ती 32.7 स्कोर्ससह लोकप्रियतेत दूस-या क्रमांकावर आहे. तर मिस्टर बजाजची लोकप्रिय भूमिका साकारलेला अभिनेता करण सिंह ग्रोव्हर 92.5 गुणांसह दूस-या स्थानावर आहे. असं म्हटलं जातंय की, ‘कसौटी ज़िन्दगी की 2’मधून करण बाहेर पडल्यामूळे त्याच्या लोकप्रियतेत खूप फरक पडला. अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया ह्या मिडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट दिली आहे.

करणच्यानंतर ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ चा कार्तिक म्हणजेच अभिनेता मोहसिन खान 72 गुणांसह तिस-या स्थानावर आहे. ‘ये है मोहब्बतें’चा रमन भल्ला अभिनेता करण पटेल 52.4 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.

अभिनेत्रींच्या लेस्टमध्ये ‘कसौटी जिंदगी की 2’मध्ये प्रेरणा शर्माच्या भूमिकेत दिसलेली अभिनेत्री एरिका फर्नांडीस 31 गुणांसह तिस-या आणि ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ची नायरा, अभिनेत्री शिवांगी जोशी 22.8 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.

‘इश्कबाज़’चा शिवाय सिंग ओबेरॉय म्हणजेच अभिनेता नकुल मेहता 43.44 गुणांसह आणि ‘नागिन-3’ची सुरभि ज्योति 19.8 गुणांसह पांचव्या स्थानावर आहे.

सहाव्या स्थानावर ‘इश्क में मरजावां’चा राजदीप सिंह म्हणजेच अभिनेता अर्जुन बिजलानी तर, सातव्या स्थानावर ‘बेपनाह प्यार’ चा रघुबीर मल्होत्रा म्हणजेच पर्ल वी पुरी आहे. तर, ‘ये है मोहब्बतें’चा आदी, अभिषेक वर्मा 8 व्या स्थानावर आणि ‘कुल्फी कुमार बाजेवाला’ चा मोहित मलिक नवव्या स्थानावर आहे. तर ‘भाभीजी घर पे हैं’ चा अभिनेता आसिफ शेख दहाव्या स्थानावर आहे.

टेलीव्हिजन अभिनेत्रींच्या लिस्टमध्ये, ‘नागिन 3’, ‘यें है मोहब्बतें’, ‘नच बलिए 9’ आणि ‘किचन चैंपियन’च्यामूळे अनीता हसनंदानी चार्टवर सहाव्या स्थानावर आहे. ज्यानंतर ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम दिशा वाखानी सातव्या स्थानावर आहे. ‘काहा हम कहा तुम’ फेम दिपीका कक्कड़ नवव्या स्थानावर आहे. तर ‘नच बलिए 9’च्यामूळे श्रद्धा आर्या रँकिंगमध्ये 10 व्या स्थानावर पोहोचलीय.

स्कोर ट्रेंड्सचे सह-संस्थापक अश्वनी कौल म्हणतात , “आम्ही मीडिया विश्लेषणासाठी 14 भाषांमध्ये 600 पेक्षा जास्त बातम्यांमधून डेटा संग्रहित करतो. यामध्ये फेसबुक, ट्विटर, प्रिंट प्रकाशन, सोशल मीडिया, व्हायरल न्यूज, प्रकाशने आणि डिजिटल प्लेटफॉर्म समाविष्ट आहेत. विविध अत्याधुनिक एल्गोरिदममूळे आम्हाला या प्रचंड प्रमाणातील डेटावर प्रक्रिया करण्यास मदत होते. आणि आम्ही बॉलीवूड सेलिब्रिटींच्या स्कोर आणि रँकिंग पर्यंत पोहोचू शकतो.”

Related Articles

Leave a Reply

Back to top button