Marathi News
” साहेब तू सरकार तू… ऐकताना प्रत्यक्ष बाळासाहेब डोळ्यांसमोर अवतरले.” – उद्धव ठाकरे
१२ जानेवारी २०१९, मुंबई येथील ताज लँड्स एन्डने उत्सवी रंग रूप धारण केले होते. भगव्या रंगात तो दिवस विलीन झाला होता जेव्हा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासह ती भूमी ठाकरे भूमीत बदलली होती. नऊवारी नेसून, भगवे फेटे बांधलेल्या सुंदर आनंदी अप्सरा, सर्वत्र गुंजणाऱ्या तुतारी आणि नाशिक ढोलच्या गजराने उपस्थितांच्या गर्दीची प्रशंसा करीत आश्चर्यकारक फ्लॅशमॉबने त्यांचे स्वागत करीत होती.
आता जल्लोष तर होणारचं… बाळासाहेब ठाकरें वरील ‘आया रे ठाकरे..’ हे हिंदी गाणे आणि ‘आपले साहेब ठाकरे’ हे आल्हाददायी जोशपूर्ण स्वरांनी स्वरबद्ध केलेले मराठी गाणे म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंसारख्या देशाला तुफानांपासून वाचवतं गरजणाऱ्या महाराष्ट्राच्या वाघाच्या व्यक्तित्वाप्रमाणेच जल्लोशपूर्ण, प्रेरणादायी आणि उत्साहवर्धक आहे. सामान्य लोकांचा असामान्य आवाज बनून जगभरात गरजणाऱ्या बाळासाहेबांस समर्पित केलेले ‘साहेब तू…’हे गाणे श्रोत्यांस बाळासाहेबांच्या काळाचे दर्शन घडवंत प्रत्येकाच्या काळजाला भिडते.
एमपी – राज्यसभा, प्रसिद्ध पत्रकार आणि चित्रपट निर्माते, संजय राऊत म्हणतात की, “जेव्हा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी हे गाणे ऐकले तेव्हा दोघेही त्या गाण्याचा आनंद घेत असताना भावनिक झाले होते. शब्द इतके प्रखर आणि अर्थपूर्ण आहेत त्यामुळे एका क्षणी ते त्या गाण्यात इतके विलीन झाले होते की त्यांच्यासमोरील सर्व काही शून्यात जमा होते. मला तर प्रत्यक्ष बाळासाहेब ठाकरेचं त्यांच्यासमोर प्रकट झाल्याचा भास होत होता. गाणे जस-जसे पुढे जात होते तस-तसे उद्धव साहेब अधिकाधिक भावनात्मक होत होते. गाणे पूर्ण झाल्यावर ते प्रथम काही बोलले असतील तर ते म्हणजे ‘गाण्यातील शब्दनशब्द प्रभावशाली आणि प्रखर आहेत.’ हे होय.”
संजय राऊत यांनी त्यांच्या सुरवातीच्या टप्प्यात संगीताची मोबाइल रेकॉर्ड केलेली आवृत्ती कशी लपवून दिली होती ही आठवण सर्वांबरोबर शेअर करत शिवसेना सुप्रीमो उद्धव ठाकरे यांनी वातावरणात हर्षवर्षाव केला. उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, “ही गाणी तेव्हाच पूर्णत्वास येतील जेव्हा ही गाणी ऐकल्यावर कोणीही त्याच्या चालीवर ताल धरल्याशिवाय राहणार नाही. ही गाणी अतिशय प्रखर आणि अर्थपूर्ण लिहिली गेलेली आहेत की त्यामुळे मला बाळासाहेबांची उपस्थिती जाणवली.”
अजित अंधारे, सीओओ – वायकॉम १८ स्टुडिओजने घोषित केले की, ‘ठाकरे’ हा चित्रपट मराठी चित्रपटांच्या इतिहासातील सर्वात जास्त स्क्रीनसह रिलीज होणार आहे. “‘ठाकरे’ हे व्यक्तिमत्व आणि विषयचं अद्वितीय आहे. संजय राऊत यांच्यासह आमचा एकसंध दृष्टीकोन आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे निर्मिती क्षेत्रात ‘ठाकरे’ हा आमचा ७५वा तर मराठी चित्रपटांतील १०वा चित्रपट आहे. आम्हाला जीवनपट तयार करणारा कारखाना असे म्हटले जाते पण बाळासाहेबांचा जीवनपट ही एक खूप मोठी जबाबदारी आहे कारण त्यांनी आखलेले मानदंड खूप उच्च आहेत. त्यामुळे या व्यक्तिमत्त्वासाठी सिनेमॅटिक न्याय देणे तितकेसे सोपे नाही. पण ‘ठाकरे’ करण्याचा उत्साहाचं वेगळा!”
कार्निव्हल ग्रुपचे संस्थापक आणि अध्यक्ष डॉ. श्रीकांत भासी म्हणतात, या चित्रपटास जगभरात उदंड प्रतिसाद मिळत आहे मिडल ईस्टम-बहरीन, कतार, सौदी अरेबियामध्ये २०० पेक्षा अधिक स्क्रीन्सद्वारे स्वागत प्राप्त झाले आहे. ‘ठाकरे’ २०१८च्या सर्वात मोठ्या ब्लॉकबस्टरच्या तुलनेतही मोठा आहे. आमच्याकडे सिंगापूर, मलेशिया सह संपूर्ण आशियामध्ये चीन वगळता 500-600 पेक्षा जास्त स्क्रीन असणार आहेत.”
अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकी यांनी व्यक्त केले की, ‘आया रे ठाकरे’ या गाण्याचे चित्रण पाहून त्याला अधिकाधिक आनंद झाला. शूटच्या पहिल्या दिवशी अमृता नवाझच्या बाजूला उभी असून देखील त्याने ओळखले नाही या मजेशीर आठवणीबद्दल सांगताना अमृता राव म्हणते की, “नवाझ माझ्या बाजूला उभे होते परंतु ६० वर्षांच्या मीनाताईंच्या गेटअप मध्ये त्यांनी मला ओळखले नाही.”
‘ठाकरे’ हा २०१९ मधील सर्वात मोठा चित्रपट असेल, याची घोषणा करून आदित्य ठाकरे यांनी सोहोळ्यातील सर्व उपस्थितांना भावनाविवश केले.
संजय राऊत प्रस्तुत, राऊटर्स एंटरटेनमेंट एलएलपी, वायकॉम १८ मोशन पिक्चर्स आणि कार्निवल मोशन पिक्चर्स निर्मित ‘ठाकरे’ चित्रपटाचे दिग्दर्शन अभिजित पानसे यांनी केलेले आहे. मराठी चित्रपटसृष्टीवर आपल्या संगीत दिग्दर्शनाने राज्य गाजवणारी गोडजोळी रोहन- रोहन यांनी ही गाणी संगीतबद्ध केलेली आहेत. ‘आया रे ठाकरे..’ हे गाणे पद्मश्री सुनील जोगी लिखित व नकाश अझीझ यांच्या आवाजात स्वरबद्ध केलेलं आहे. ‘आपले साहेब ठाकरे’ हे गाणे मंदार चोळकर लिखित व अवधूत गुप्तेच्या आल्हाददायी जोशपूर्ण स्वरांत तर ‘साहेब तू…’ हे मनोज यादव लिखित सुखविंदर सिंग यांच्या मधुर स्वरांनी स्वरबद्ध केलेले आहे. अहमद खान यांनी ‘आया रे ठाकरे ‘ या खास गाण्याची कोरियोग्राफी केली आहे. ‘ठाकरे’ येत्या २५ जानेवारी २०१९ ला संपूर्ण जगभरात प्रदर्शित होणार आहे.