प्रियंका चोप्रा जोनास बनली बॉलीवूड क्वीन आणि सलमान खान बनला बॉलीवूड किंग !
सलमान खान आणि प्रियंका चोप्रा जोनासच्यासाठी स्कोर ट्रेंड्सकडून नव्या वर्षात एक गोड बातमी आलीय. नुकत्याच आलेल्या स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या अहवालातून हे सिध्द झालंय की, सलमान आणि प्रियंकाच 2018 मधले सर्वाधिक चर्चित कलाकार होते. 1 जानेवरी 2018 पासून 31 डिसेंबर 2018 ह्या संपूर्ण वर्षाच्या आलेल्या आकडेवारीनूसार, सर्वाधिक आठवडे नंबर 1 स्थानावर राहिलेले सलमान आणि प्रियंका 2018 सालातले ‘बॉलीवूड ट्रेंडसेटर’ ठरलेत.
गेल्या वर्षभरात (1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2018 ह्या कालावधीत) स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्टवर सुपरस्टार सलमान खान 52 आठवड्यांपैकी 24 आठवडे तर प्रियंका 20 आठवडे नंबर वन स्थानी विराजमान असल्याने दोघेही सर्वाधिक लोकप्रिय बॉलीवूड कलाकार असल्याचे दिसून येते आहे. अमेरिकेतील मीडिया टेक कंपनी स्कोर ट्रेन्ड्स इंडियाव्दारे ही प्रमाणित आणि संशोधित आकडेवारी उपलब्ध झाली आहे.
स्कोर ट्रेंड्सचे सह-संस्थापक अश्वनी कौल सांगतात, “प्रियंका आणि सलमान दोघेही 2018 ह्या संपूर्ण वर्षभरात सातत्याने बातम्यांच्या मथळ्यांमध्ये राहिले. सलमानचे विवाद असोत की, कोर्टाचे खटले किंवा मग त्याचे सिनेमे असोत. तो सातत्याने त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक कारणांमूळे वर्तमानपत्रांमध्ये आणि सोशल मीडियावर दिसत होता. तिच गोष्ट प्रियंका चोप्राचीही निक जोनाससोबतच्या प्रियंकाच्या अफेअरपासून ते त्यांच्या लग्नापर्यंत प्रियंका सातत्याने बातम्यांमध्ये होती. आणि त्याच कारणास्तव तिच्या लोकप्रियतेतही वाढ झाली. म्हणूनच प्रियंका आणि सलमान दोघांचाही लोकप्रियतेत इतर बॉलीवूड कलाकारांवर वरचष्मा दिसून येतोय.“
अश्वनी कौल पूढे सांगतात, “आम्ही 14 भारतीय भाषांमधील 600 हून अधिक बातम्यांच्या स्त्रोतातून डेटा गोळा करतो. यामध्ये फेसबुक, ट्विटर, मुद्रित प्रकाशने, सोशल मीडियावरील व्हायरल न्यूज, ब्रॉडकास्ट आणि डिजिटल प्लॅटफॉर्म यांचा समावेश आहे. विविध अत्याधुनिक एल्गोरिदममूळे आम्हाला या प्रचंड प्रमाणातील डेटावर प्रक्रिया करण्यास मदत होते. आणि आम्ही बॉलीवूड सेलिब्रिटींच्या स्कोर आणि रँकिंग पर्यंत पोहोचू शकतो.”