Sumedh Sanskruti : सुमेध-संस्कृती M-Townची नवी फ्रेश जोडी

JmAMP
Sumedh Sanskruti
Sumedh Sanskruti

अभिनेत्री संस्कृती बालगुडे आपल्या इन्स्टाग्राम अकांउंटवर खूप एक्टिव असते. आणि गेले काही दिवस तिच्या इन्स्टापोस्ट आणि स्टोरीज ह्या अभिनेता सुमेध मुदगलकरविषयी जास्त असतात. अशावेळी अर्थातच तिच्या फॉलोवर्सना सध्या तिच्यात आणि सुमेधमध्ये नक्की काय सुरू आहे, ह्याची खूप उत्सुकता आहे.

सिनेसृष्टीतल्या सुत्रांच्या अनुसार, संस्कृती आणि सुमेधची नुकत्याच एका प्रोजेक्टच्या निमित्ताने मैत्री झाली. दोघंही समवयस्क असल्याने मैत्री ही प्रोजेक्टपूरती न राहता, मग ती घट्ट मैत्रीत रूपांतरीत झाली. त्यामूळे फक्त संस्कृतीच नाही तर सुमेधच्याही इन्स्टापोस्ट आणि स्टोरीजमध्ये अधूममधून संस्कृतीचे मेन्शन्स असतात.
सुमेधच्या जवळच्या सूत्रांच्या अनुसार, सुमेध आणि संस्कृतीने आत्तापर्यंत एकत्र सिनेमा केला नसला तरीही दोघेही एकमेकांसोबत खूप छान दिसतात. सळसळत्या उत्साहातली ‘बबली गर्ल’ संस्कृती आणि तितकाच शांत चॉकलेट बॉय सुमेध एक क्युट कपल बनू शकतात. आणि लवकरच हे दोघेही एका रोमँटिक म्युझिक अल्बममध्ये एकत्र दिसणार आहेत.
संस्कृती बालगुडेला ह्यासंदर्भात विचारणा केल्यावर ती हसून म्हणते, “हो, सुमेध आणि मी नुकताच एक व्हिडीयो अल्बम शूट केलाय. उत्तम लोकेशन्स, श्रवणीय संगीत असलेला हा म्युझिक अल्बम लवकरच तुमच्या भेटीला येईल. “
फिल्म इंडस्ट्रीतल्या ह्या फ्रेश जोडीची सिझलींग केमिस्ट्री पाहण्याची उत्सुकता आता नक्कीच दोघांच्याही चाहत्यांना लागली असेल.

About justmarathi

Check Also

Zoljhal

“झोलझाल” चे जय वीरू

JmAMP शोलेमधली जय-वीरूची मैत्री लवकरच मराठी पडद्यावर पहायला मिळणार आहे. अमोल कांगणे आणि ऋतुराज फडके …

Leave a Reply