Marathi News

प्रेमवारी” चित्रपटाचे पोस्टर लाँच

Premvari

 ‘प्रेम’ या शब्दाचा  प्रत्येक जण आपल्या सोयीने अर्थ काढत असतो. प्रेमाची व्याख्या, प्रेमाची रूपे देखील सर्वासाठी वेगळी असतात. काहीशा ह्याच संकल्पनेवर आधारित  ‘प्रेमवारी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. नुकतेच या चित्रपटाच्या  पोस्टरचे शिर्डी येथे साईबाबाच्या चरणी अनावरण करण्यात आले. हे पोस्टर पाहून हा नक्कीच  एक रोमँटिक सिनेमा वाटत आहे. या पोस्टर वर सिनेमातील मुख्य कलाकार चिन्मय उदगीरकर आणि मयुरी कापडणे दिसत आहे. व्हॅलेंटाइन डे च्या आठवड्यात म्हणजेच ८ फेब्रुवारी ला हा  सिनेमा रिलीज होणार आहे.
रोमँटिक सिनेमा आणि व्हॅलेंटाइन डे चा आठवडा हा एक चांगला योगायोग जुळून आला आहे. या चित्रपटातून मयुरीच्या रूपाने मराठी सिनेसृष्टीत एक नवीन चेहरा येत आहे. साईममित प्रोडक्शन  निर्मित ‘प्रेमवारी’ या आगामी सिनेमाद्वारे प्रेमाची नवी परिभाषा लोकांसमोर येणार आहे, या सिनेमाला मराठी चित्रपटसृष्टीतला प्रसिद्ध संगीतदिग्दर्शक अमितराज याने संगीत दिले.
या सुंदर चित्रपटाचे  लेखन,निर्मिती आणि दिग्दर्शन राजेंद्र कचरू गायकवाड यांनी केले असून, प्रस्तुतकर्त्याची धुरादेखील त्यांनीच सांभाळली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button