
लॅन्डमार्क फिल्म्सच्या बॅनरखाली प्रदर्शित होत असलेला ‘पिप्सी‘ हा सिनेमा येत्या २७ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. राज्य पुरस्कारप्राप्त बालकलाकार मैथिली पटवर्धन आणि साहिल जोशी या छोट्या कलाकारांची प्रमुख भूमिका असलेल्या सिनेमाचा नुकताच सोशल नेट्वर्किंग साईटवर मुख्य पोस्टर लाँच करण्यात आला. या सिनेमाच्या पोस्टरवर ट्रेनच्या खिडकीतून दोन शाळकरी मुले बाहेर हात हलवताना दिसून येत असून, ही दोघेजण कुठल्यातरी प्रवासाला किंवा एखाद्या सहलीला जात असल्याचे दिसून येत आहे. शिवाय या पोस्टरवर ‘अ बॉटल फूल ऑफ हॉप’ ही टॅगलाईनदेखील दिली असल्यामुळे, या दोन मुलांच्या आयुष्यात ‘पिप्सी’ची ही बाटली कोणता आनंद घेऊन येते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.