Marathi News

रहस्यमयी ‘मिरांडा हाऊस

MIRANDA HOUSE

सध्या मराठीमध्ये  वेगवेगळ्या विषयांवर अनेक चांगले चित्रपट येत आहेत. सोबतच मराठी चित्रपटामध्ये खूप चांगले प्रयोगही होत आहेत. अशाच एका वेगळ्या विषयावर आधारित ‘मिरांडा हाऊस’ या चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट प्रसिद्ध दिगदर्शक राजेंद्र तलक यांनी दिग्दर्शित केला असून   इरिस प्रॉडक्शन हाऊसने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. राजेंद्र तलक यांनी याआधी  ‘अ रेनी डे’, ‘सावरिया. कॉम’, ‘सावली’ हे वेगळ्या धाटणीचे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत.
‘मिरांडा हाऊस’ या चित्रपटाच्या निमित्ताने राजेंद्र तलक पुन्हा नवीन विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या चित्रपटात  मिलिंद गुणाजी, पल्लवी सुभाष, साईंकित कामत हे त्रिकुट दिसणार आहे. या चित्रपटाचा टिझर पाहिला तर टिझरमध्ये पल्लवी सुभाष आणि साईंकित कामत  बंदूक ताणून उभे आहेत. तर दुसऱ्या  दृश्यात पल्लवी सुभाष कोणाच्यातरी  मिठीत दिसत आहे. ही दोन विरोधी दृशे पाहिल्यावर चित्रपट नक्की कशावर आधारित आहे, याचा अंदाज येत नाही, मात्र हा चित्रपट नक्कीच वेगळा, मनोरंजक आणि रहस्यमय असणार हे नक्की. याआधी देखील अनेक रहस्यमय चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. पण ‘मिरांडा हाऊस’  हा चित्रपट या सगळ्यामध्ये नक्की वेगळा असेल यात शंका नाही. शिवाय अनेक दिवसांनी पल्लवी सुभाष, मिलिंद गुणाजी मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत. तर मग तयार राहा एका नवीन आणि रहस्यमय चित्रपटासाठी. ‘मिरांडा हाऊस’  हा  चित्रपट येत्या १९ एप्रिलला प्रदर्शित होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button